Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 56

63 Mantra
3/56
Devata- सोमो देवता Rishi- बन्धुर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
व॒यꣳ सो॑म व्र॒ते तव॒ मन॑स्त॒नूषु॒ बिभ्र॑तः। प्र॒जाव॑न्तः सचेमहि॥५६॥

व॒यम्। सो॒म॒। व्र॒ते। तव॑। मनः॑। त॒नूषु॑। बिभ्र॑तः। प्र॒जाव॑न्त॒ इति॑ प्रजाऽव॑न्तः। स॒चे॒म॒हि॒ ॥५६॥

Mantra without Swara
वयँ सोम व्रते तव मनस्तनूषु बिभ्रतः । प्रजावन्तः सचेमहि ॥

वयम्। सोम। व्रते। तव। मनः। तनूषु। बिभ्रतः। प्रजावन्त इति प्रजाऽवन्तः। सचेमहि॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सोम) सर्व जगाच्या उत्पत्तीकर्त्या परमेश्‍वरा, (तव) तुझ्या आज्ञेप्रमाणे (व्रते) आम्ही सत्यभाषण आदी धर्मांचे अनुष्ठान करीत (तनूषु) अतीव सुखदायी देहात सुख भोगीत राहू (मनः) तसेच अन्तःकरणाच्या अहंकारादी वृत्तीस (बिभ्रतः) धारण करीत (प्रजावन्तः) बहुसन्तानवान व राष्ट्र रूप धनाने संपन्न होऊन (सचेमहि) सर्वसुख प्राप्त करू. ॥1॥^दुसरा अर्थ - (तव) या (सोम) सोमलता आदी औषधीचे (व्रते) सेवन करून तसेच त्या औषधींच्या यथार्थ गुण-लाभांचे ज्ञान प्राप्त करून (तनूषु) शरीरासाठी स्वास्थ मिळवू. (मनः) चित्तवृत्तीला (बिभ्रतः) धारण व वश करीत (प्रजावन्तः) सन्तान, राज्य आदी धनाने समृद्ध होऊन (वयम्) आम्ही लोक (सचेमहि) सर्व सुख प्राप्त करू ॥2॥ ॥56॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. जी माणसें परमेश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे वागणारी असतात, तीच सदैव शारीरिक व आत्मिक सुख प्राप्त करतात. त्याचप्रमाणे सोम आदी औषधींचे यथोचित पद्धतीने सेवन करूनही मनुष्य सुख मिळवू शकतात. आळशी माणसांना मात्र कधीही सुख मिळत नाही. ॥56॥
Subject
पुढील मंत्रात सोम शब्दाने ईश्‍वर आणि औषधींच्या रसाविषयी सांगितले आहे -