Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 52

63 Mantra
3/52
Devata- इन्द्रो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- विराट् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
सु॒स॒न्दृशं॑ त्वा व॒यं मघ॑वन् वन्दिषी॒महि॑। प्र नू॒नं पू॒र्णब॑न्धुर स्तु॒तो या॑सि॒ वशाँ॒२ऽअनु॒ योजा॒ न्विन्द्र ते॒ हरी॑॥५२॥

सु॒सं॒दृश॒मिति॑ सुऽसं॒दृश॑म्। त्वा॒। व॒यम्। मघ॑व॒न्निति॒ मघ॑ऽवन्। व॒न्दि॒षी॒महि॑। प्र। नू॒नम्। पू॒र्णब॑न्धुर॒ इति॑ पू॒र्णऽब॑न्धुरः। स्तु॒तः। या॒सि॒। वशा॑न्। अनु॑। योज॑। नु। इ॒न्द्र॒। ते॒। हरी॒ऽइति॒ हरी॑ ॥५२॥

Mantra without Swara
सुसन्दृशं त्वा वयम्मघवन्वन्दिषीमहि । प्र नूनम्पूर्णबन्धुर स्तुतो यासि वशाँ अनु योजा न्विन्द्र ते हरी ॥

सुसंदृशमिति सुऽसंदृशम्। त्वा। वयम्। मघवन्निति मघऽवन्। वन्दिषीमहि। प्र। नूनम्। पूर्णबन्धुर इति पूर्णऽबन्धुरः। स्तुतः। यासि। वशान्। अनु। योज। नु। इन्द्र। ते। हरीऽइति हरी॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचे दोन अर्थ आहेत-एक विद्वानाप्रत विनंती दुसरा-सूर्याचा महिमा)- (मधवन्) उत्तमोत्तम विद्या आदी धनांनी समृद्ध (इन्द्र) हे विद्वान महाशय, (वयम्) आम्ही (सुसद्दशम्) उत्तम प्रकारे कार्य-व्यवहार आदींचे निरीक्षण करणारे जे आपण, अशा (ते) आपली (नूनम्) अवश्यमेव (वंदिषीमहि) स्तुती करतो. आमच्याकडून (स्तुतः) स्तुती व प्रार्थना ऐकून आपण आम्हाला (मशान) ईप्सित पदार्थांचे दान करता. हे विद्वान व शूरवीर मनुष्या (ते) आपल्या (हरी) शक्ती आणि पराक्रमांचा उपयोग आपण (अनुप्रयोज) आमच्या सहाय्याकरिता अवश्य करा. ॥52॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष आणि उपमा या दोन अलंकारांचा उपयोग केला आहे. मनुष्यांनी सर्व जगाचे हित करणार्‍या जगदीश्‍वराचीच स्तुती करावी, अन्य कोणाचीही करू नये. कारण असे की ज्याप्रमाणे सूर्यलोक सर्व आकारवान् पदार्थांना प्रकाशित करतो, (व त्याच्या प्रकाशामुळेच सर्व पदार्थ दिसतात) त्याप्रमाणे उपासकांची उपासना ऐकून परमेश्‍वर देखील भक्तजनांच्या अंतःकरणात विज्ञानाचा प्रकाश करतो आणि त्यामुळे सर्व सत्यव्यवहाराचा प्रकाश उद्वित होतो म्हणून ईश्‍वरा व्यतिरिक्त अन्य कोणाचीही उपासना कदापी करूं नये. ॥52॥
Subject
तो, इन्द्र कसा आहे, यावषियी पुढील मंत्रात सांगितले आहे -