Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 46

63 Mantra
3/46
Devata- इन्द्रमारुतौदेवते Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- भूरिक् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
मो षू ण॑ऽइ॒न्द्रात्र॑ पृ॒त्सु दे॒वैरस्ति॒ हि ष्मा॑ ते शुष्मिन्नव॒याः। म॒हश्चि॒द्यस्य॑ मी॒ढुषो॑ य॒व्या ह॒विष्म॑तो म॒रुतो॒ वन्द॑ते॒ गीः॥४६॥

मोऽइति॒ मो। सु। नः॒। इ॒न्द्र॒। अत्र॑। पृ॒त्स्विति॑ पृ॒त्ऽसु। दे॒वैः। अस्ति॑। हि। स्म॒। ते॒। शु॒ष्मि॒न्। अ॒व॒या इत्य॑व॒ऽयाः। म॒हः। चि॒त्। यस्य॑। मी॒ढुषः॑। य॒व्या। ह॒विष्म॑तः। म॒रुतः॑। वन्द॑ते। गीः ॥४६॥

Mantra without Swara
मो षू ण इन्द्रात्र पृत्सु देवैरस्ति हि ष्मा ते शुष्मिन्नवयाः । महश्चिद्यस्य मीढुषो यव्या हविष्मतो मरुतो वन्दते गीः ॥

मोऽइति मो। सु। नः। इन्द्र। अत्र। पृत्स्विति पृत्ऽसु। देवैः। अस्ति। हि। स्म। ते। शुष्मिन्। अवया इत्यवऽयाः। महः। चित्। यस्य। मीढुषः। यव्या। हविष्मतः। मरुतः। वन्दते। गीः॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) शूरवीर (सेनेपती राजा वा सैनिक) तुम्ही (अत्र) या लोकात (मृत्यु) युद्धामधे (दैवैः) विद्वानांसह (नः) आम्हां धार्मिक लोकांचे (सु) चांगल्याप्रकारे रक्षण करा. (तथा) (मो) आमचे हनन करू नका आमची हाती घेईल अस कार्य करू नका आणि शत्रूला करू देऊ नका) हे (शुष्मिन्) पूर्ण बलशाली वीरवर, (हि) निश्‍चयाने (चित्) ज्याप्रमाणे (ते) तुमची) (महः) महान् (गीः) वेदानुकूल वाणी (मीढुषः) विद्यादी उत्तम गुणांनी सिंचन करून वाढविले तसेच (हविष्मतः) उत्तमोत्तम पदार्थयुक्त हवी (मरूतः) प्रत्येक ऋतूमधे यज्ञ करणार्‍या विद्वानांच्या (वन्दते) गुणांना प्रकट करते, तसेच ज्याप्रमाणे विद्वज्जन तुमच्या वीरत्वादी गुणांचे वर्णन आमच्यासमोर करून आम्हांस आनंदित करतात व स्वतःही आनंदित होतात, त्याच प्रमाणे (अवयाः) यज्ञ करणारा यजमान तुमच्या आज्ञेने तुमच्या रक्षणाच्या आश्रयाने निर्भय होऊन (यव्या) उत्तम यव आदी अन्नांचे अग्नीमधे हवन करतो, ते सर्व हव्य पदार्थ सर्व प्राण्यांसाठी सुखकारी होतात. ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमालंकार आहे. जेव्हा लोक परमेश्‍वराचे आराधना करून युद्धासाठी आवश्यक सामग्री साहित्याचा संग्रह करतात आणि युद्धामधे शत्रूवर विजय मिळवून चक्रवर्ती राज्य करून प्रजांचे उत्तम प्रकारे परिपालन करतात व आनंदात राहतात, तेव्हां त्या राज्यासच उत्तम राज्य म्हणावे. ॥46॥
Subject
ईश्‍वराच्या आणि शूरवीरांच्या सहाय्याने युद्धात विजय प्राप्त होतो, पुढील मंत्रात या विषयी प्रतिपादन केले आहे -