Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 45

63 Mantra
3/45
Devata- मरुतो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
यद् ग्रामे॒ यदर॑ण्ये॒ यत् स॒भायां॒ यदि॑न्द्रि॒ये। यदेन॑श्चकृ॒मा व॒यमि॒दं तदव॑यजामहे॒ स्वाहा॑॥४५॥

यत्। ग्रामे॑। यत्। अर॑ण्ये। यत्। स॒भाया॑म्। यत्। इन्द्रि॒ये। यत्। एनः॑। च॒कृ॒म। व॒यम्। इ॒दम्। तत्। अव॑। य॒जा॒म॒हे॒। स्वाहा॑ ॥४५॥

Mantra without Swara
यद्ग्रामे यदरण्ये यत्सभायाँ यदिन्द्रिये । यदेनश्चकृमा वयमिदन्तदव यजामहे स्वाहा ॥

यत्। ग्रामे। यत्। अरण्ये। यत्। सभायाम्। यत्। इन्द्रिये। यत्। एनः। चकृम। वयम्। इदम्। तत्। अव। यजामहे। स्वाहा।४५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वयम्) आवश्यक व्यवसाय कर्मादी करणारे (यत्) (ग्रामे) आम्ही जे गावामधे निवास करणारे गृहस्थजन आहोत, ते लोक (यत) (अरण्ये) जे वानप्रस्थ जन वनाचे सेवन करीत आहेत, (यत्सभायाम्) जे विद्वज्जन सभा-समितीत बसतात, तसेच (यत्)(सन्द्रिये) योगीजन मन आणि श्रोत्रादींचे विरोधन करतात त्या सर्व वानप्रस्थ, विद्वान आणि योगीजनांची आम्ही सेवा करीत राहू. त्यांच्या जवळ राहून (एनः) पाप वा अधर्म (चकृम) जे केले आहेत व जे घडण्याची शक्यता आहे, त्या पाप-अधर्मांना (अवयजामहे) भस्मीभूत करू. त्या वन, सभा आणि योगीस्थान याठिकाणी राहून (स्वाहा) सत्य-भाषण, पुण्यार्जन व धर्माचरण (चक्रम) करीत तिथे राहणे हेच आम्हांसाठी योग्य आहे. (तत्) त्या सर्व लाभांना (यजामहे) आम्ही प्राप्त करीत राहू ॥45॥
Essence
भावार्थ - चार आश्रमात असणार्‍या सर्व मनुष्यांनी मनसा, वाचा, आणि कर्मणा सत्य आचरण करावे, पाप व अधर्माचा त्याग करावा. तसेच विद्वत्वभेत बसून, विद्या व उत्तमोत्तम ज्ञान संपादन करून आपल्या सन्ततीला सुखी करावे व त्यांची उन्नती घडवावी. ॥45॥
Subject
पुढील मंत्रात गृहस्थजनांच्या कर्तव्य-कर्मांविषयी उपदेश केला आहे -