Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 41

63 Mantra
3/41
Devata- वास्तुरग्निः Rishi- आसुरिर्ऋषिः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
गृहा॒ मा बि॑भीत॒ मा वे॑पध्व॒मूर्जं॒ बिभ्र॑त॒ऽएम॑सि। ऊर्जं॒ बिभ्र॑द्वः सु॒मनाः॑ सुमे॒धा गृ॒हानैमि॒ मन॑सा॒ मोद॑मानः॥४१॥

गृहाः॑। मा। बि॒भी॒त॒। मा। वे॒प॒ध्व॒म्। ऊर्ज॑म्। बिभ्र॑तः। आ। इ॒म॒सि॒। ऊर्ज॑म्। बिभ्र॑त्। वः॒। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। सु॒मे॒धा इति॑ सुऽमे॒धाः। गृ॒हान्। ए॒मि॒। मन॑सा। मोद॑मानः ॥४१॥

Mantra without Swara
गृहा मा बिभीत मा वेपध्वमूर्जम्बिभ्रत एमसि । ऊर्जम्बिभ्रद्वः सुमनाः सुमेधा गृहाऐमि मनसा मोदमानः ॥

गृहाः। मा। बिभीत। मा। वेपध्वम्। ऊर्जम्। बिभ्रतः। आ। इमसि। ऊर्जम्। बिभ्रत्। वः। सुमना इति सुऽमनाः। सुमेधा इति सुऽमेधाः। गृहान्। एमि। मनसा। मोदमानाः॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ब्रह्मचर्याश्रमात असतांना सर्व विद्याचे ग्रहण करून गृहस्थाश्रमी झालेल्या व (ऊर्जम्) शौर्य, पराक्रमादी सद्गुण (बिभ्रतः) धारण करणार्‍या (गृहाः) ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थी होण्याची इच्छा करणार्‍या हे मनुष्यांनो, तुम्ही आता गृहस्थाश्रमाचा यथावत् स्वीकार करा. गृहस्थाश्रमाचे अनुष्ठान व कर्तव्य-कर्मांपासून (मा बिभीत) भयभीत होऊ नका. (मा वेपध्वम्) कंपित होऊ नका. शौर्य-पराक्रम गाजविणारे आम्ही गृहस्थाश्रमी लोक (गृहान्) गृहस्थाश्रमी होऊ इच्छिणार्‍या तुम्हां लोकांसाठी (एमसि) नित्य प्राप्त आहोत. मी गृहस्थश्रमी (वः) तुमच्यासह तुमच्यामधेच आहे. तेव्हां तुम्ही निर्भय राहून गृहस्थश्रमात राहून (सुमनाः) उत्तमज्ञान (सुमेधाः) उत्तमबुद्धी व (मनसा) उत्तम विज्ञान आदीने (मोदमानः) सुख व आनंद प्राप्त करीत (ऊर्जम्) अत्यंत शक्ती (ब्रिभ्रत्) धारण करा. मी देखील तुमच्या सह सदा आत्यांतिक सुखांना (एमि) प्राप्त करीत राहीन असे व्हावे. ॥41॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी ब्रह्मचर्याश्रमाचे यथोचित व पूर्ण पालन करून दोघांच्या समान स्वभाव, विद्या, रूप, बुद्धी आणि शक्ती आदी सद्गुणांचा विचार करून युवावस्थेत स्वयंवर-पद्धतीने विवाह करावा. शारीरिक आणि आत्मिक बळ प्राप्त करावे. नंतर पुत्रांची उत्पत्ती करून सर्व उपयुक्त साधनांसहित चांगले आचरण करीत राहावे. कोणाही माणसाने गृहस्थाश्रम स्वीकारण्यापासून भय मानूं नये, कारण गृहस्थाश्रमच सर्व चांगल्या व्यवहारांचे मूळ आहे आणि इतर आश्रम त्यावर आश्रित आहेत. यामुळे उत्तम प्रकारे गृहस्थाश्रमाचे अनुष्ठान करावे व सुखात राहावे. कारण की गृहस्थाश्रमाशिवाय मनुष्यांचे राज्यप्राप्ती व्यवहार कदापी संपन्न होत नाहीत.॥41॥
Subject
पुढील मंत्रात गृहस्थाश्रमाच्या अनुष्ठानादी कर्त्तव्यांचा उपदेश केला आहे -