Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 4

63 Mantra
3/4
Devata- अग्निर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
उप॑ त्वाग्ने ह॒विष्म॑तीर्घृ॒ताची॑र्यन्तु हर्यत। जु॒षस्व॑ स॒मिधो॒ मम॑॥४॥

उप॑। त्वा॒। अ॒ग्ने॒। ह॒विष्म॑तीः। घृ॒ताचीः॑। य॒न्तु॒। ह॒र्य्य॒त॒। जु॒षस्व॑। स॒मिध॒ऽइति॑ स॒म्ऽइधः॑। मम॑ ॥४॥

Mantra without Swara
उप त्वाग्ने हविष्मतीर्घृताचीर्यन्तु हर्यत । जुषस्व समिधो मम ॥

उप। त्वा। अग्ने। हविष्मतीः। घृताचीः। यन्तु। हर्य्यत। जुषस्व। समिधऽइति सम्ऽइधः। मम॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अग्ने) हा अग्नी (मम) यज्ञ करणार्‍या अशा माझ्या (हर्य्यत) इच्छित पदार्थांची प्राप्ती करून देण्याचे कारण आहे, म्हणून वांछनीय आहे. (अग्ने) हा अग्नी (मम) यज्ञ करणार्‍या अशा माझ्याद्वारे आहुत (समिध:) काष्ठ, घृत आदी पदार्थांचे (जुषस्व) सेवन करतो. (तम्) त्या अग्नीसाठी आवश्यक अशा घृत आदी पदार्थांची प्राप्ती मला होत राहावी, यासाठी तुम्ही (हविष्मती) धेष्ठ हवीमुक्त (घृताची:) घृत आदी पदार्थांची संयुक्त आहुती आणि काष्ठ आदी सामग्री प्रतिदीनी संचित करा (आणीतजा) ज्यायोगे माझ्या नित्य निरंतर यज्ञकार्यात विघ्न उपस्थित होणार नाही) ॥4॥
Essence
भावार्थ - मनुष्यगण जेव्हां या अग्नीमधे काष्ठ, घृत आदी पदार्थांची आहुती देतात, तेव्हां अग्नी त्या वस्तूंना अतिसूक्ष्म करून वायूच्या सहाय्याने देशदेशांतराकडे पाठवितो आणि दुर्गंधादी दोषांचे निवारण करून सर्व जीवांना सुखी करतो. सर्व मनुष्यांनी हे सर्व हितकारी तत्त्व समजून घेतले पाहिजे.॥4॥
Subject
तो अग्नी कसा आहे, पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे,