Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 39

63 Mantra
3/39
Devata- अग्निर्देवता Rishi- आसुरिर्ऋषिः Chhand- भूरिक् बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒यम॒ग्निर्गृ॒हप॑ति॒र्गार्ह॑पत्यः प्र॒जाया॑ वसु॒वित्त॑मः। अग्ने॑ गृहपते॒ऽभि द्यु॒म्नम॒भि सह॒ऽआय॑च्छस्व॥३९॥

अ॒यम्। अ॒ग्निः। गृ॒हप॑ति॒रिति॑ गृ॒हऽप॑तिः। गार्ह॑पत्य॒ इति॒ गार्ह॑ऽपत्यः॑। प्र॒जाया॒ इति॑ प्र॒जायाः॑। व॒सु॒वित्त॑म॒ इति॑ वसु॒वित्ऽत॑मः। अग्ने॑। गृ॒ह॒प॒त॒ इति॑ गृहऽपते। अ॒भि। द्यु॒म्नम्। अ॒भि। सहः॑। आ। य॒च्छ॒स्व॒ ॥३९॥

Mantra without Swara
अयमग्निर्गृहपतिर्गार्हपत्यः प्रजाया वसुवित्तमः । अग्ने गृहपते भि द्युम्नमभि सह आ यच्छस्व ॥

अयम्। अग्निः। गृहपतिरिति गृहऽपतिः। गार्हपत्य इति गार्हऽपत्यः। प्रजाया इति प्रजायाः। वसुवित्तम इति वसुवित्ऽतमः। अग्ने। गृहपत इति गृहऽपते। अभि। द्युम्नम्। अभि। सहः। आ। यच्छस्व॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहपते) गृहाचे पालनकर्त्या, (अग्ने हे परमेश्‍वरा, (अयम्) हा तूच (गृहयतिः) स्थानविशेषांच्या पालनाचे कारण आहेना. (गार्हपत्यः) आपल्या घरांचे पालन करणार्‍या गृहस्थांशी संयुक्त होऊन (प्रजाया वसुवित्तमः) प्रजा, सन्ततीच्या पालनासाठी त्यांना सर्व प्रकारचे धन प्राप्त करून देणारा आहेस. कृपा करून आम्हास ही (द्युम्नम्) सुखदायक धन-संपत्तीचे (अभ्यायच्छरच) उत्तमप्रकारे दान दे. तसेच (सहः) उत्तम शक्ती आणि पराक्रमाची आम्हांस (अभ्यायच्छरच) प्राप्ती करून दे. ॥1॥^दुसरा अर्थ - हा (गृहपतिः) उत्तम स्थानांचा पालक (प्रजायाः) हा अग्नी पुत्र, मित्र, पत्नी आणि सेवक आदी प्रजाजनांसाठी (वसुक्तिमः) द्रव्यादी प्राप्त करून देणारा आहे (गार्हपत्यः) आपल्या घरांचे पालन-पोषण करणार्‍या गृहयतीच्या उपयोगात येणारा आहे. (अयम्) हाच (अग्ने) विद्युत, सूर्य व भौतिक अग्नी रूपाने प्रत्यक्ष आहे. यामुळे तो (गृहपते) गृहांचा पालनकर्ता आहे. असा तो (अग्ने) अग्नी आम्हांकरिता (अभिद्युम्नम्) सर्वात उत्तमोत्तम संपत्ती देणारा व (सह) उत्तम बळ देणारा होऊन आमची (अभ्यायच्छस्व) सर्वप्रकारे उन्नती व विस्तार करो ॥39॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. गृहस्थाश्रमी जन जेव्हां ईश्‍वराची उपासना करीत व त्याच्या आज्ञेचे पालन करीत कार्यपूर्तीसाठी या अग्नीचा उपयोग करतात, तेव्हां हा अग्नी अनेक प्रकारच्या धनांची आणि शक्तीची उपलब्धी करून देतो. कारण की हा अग्नीच मनुष्यांकरिता पदार्थाच्या प्राप्तीमधे यश देणारा आहे. ॥39॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वर आणि भौतिक अग्नीविषयी उपदेश केला आहे -