Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 38

63 Mantra
3/38
Devata- अग्निर्देवता Rishi- आसुरिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आग॑न्म वि॒श्ववे॑दसम॒स्मभ्यं॑ वसु॒वित्त॑मम्। अग्ने॑ सम्राड॒भि द्यु॒म्नम॒भि सह॒ऽआय॑च्छस्व॥३८॥

आ। अ॒ग॒न्म॒। वि॒श्ववे॑दस॒मिति॑ वि॒श्वऽवे॑दसम्। अ॒स्मभ्य॑म्। व॒सु॒वित्त॑म॒मिति॑ वसु॒वित्ऽत॑मम्। अग्ने॑। स॒म्रा॒डिति॑ सम्ऽराट्। अ॒भि। द्यु॒म्नम्। अ॒भि। सहः॑। आ। य॒च्छ॒स्व॒ ॥३८॥

Mantra without Swara
आगन्म विश्ववेदसमस्मभ्यँवसुवित्तमम् । अग्ने सम्राडभि द्युम्नमभि सह आ यच्छस्व ॥

आ। अगन्म। विश्ववेदसमिति विश्वऽवेदसम्। अस्मभ्यम्। वसुवित्तममिति वसुवित्ऽतमम्। अग्ने। सम्राडिति सम्ऽराट्। अभि। द्युम्नम्। अभि। सहः। आ। यच्छस्व॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सम्राट) प्रकाशस्वरूप (अग्ने) हे जगदीश्‍वरा, तू (अस्मभ्यम्) आम्हां उपासकजनांसाठी (द्युम्नम्) प्रकाशमान उत्तम कीर्ती व (सह) उत्तम बल (अभ्यायच्छस्व) सर्व प्रकारे देणारा आहेस, म्हणून आम्ही (वसुषित्तमम्) पृथ्वी आदी सर्व लोकांचे ज्ञान असणार्‍या व (विश्‍ववेदसम्) सर्वसुखांना जाणणार्‍या व सुख देणार्‍या तुला (अभ्यागन्म) सर्वतः प्राप्त होत आहोत (कीर्ती, शक्तीसाठी तुझ्या शरण येत आहोत) ॥1॥ ^दुसरा अर्थ (अग्निपरक) - हा (सम्राट) प्रकाशित व दीप्तीमान (अग्ने) भौतिक अग्नी (अस्मभ्यम्) आम्हां याज्ञिकजनांसाठी (द्युम्नम्) उत्तम यश आणि (सह:) उत्तम बल (अभ्यायच्छस्व) सर्वप्रकारे देतो. अशा (वसुवित्तमम्) सूर्याच्या रूपाने पृथ्वी आदी लोकांना प्रकाशित करणार्‍या (विश्‍ववेदसम्) सर्व सुखांचे कारण व साधन असलेल्या या अग्नीला आम्ही प्रकाशादी देण्याकरितां (अभ्यागन्भ) सर्वथा प्राप्त करतो (अग्नीला यज्ञ व इतर व्यवहारांसाठी उपयोगात आणतो) ॥2॥ ॥38॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे, मनुष्यांनी परमेश्‍वराच्या आणि भौतिक अग्नीच्या गुणांना जाणून घेऊन त्या प्रमाणे ध्यान आणि अनुष्ठान करावे व त्याद्वारे यश आणि शक्तीचा विकासविस्तार करावा. ॥38॥
Subject
आतां अग्नी शब्दाने परमेश्‍वर आणि भौतिक अग्नी यांच्याविषयी कथन केले आहे -