Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 36

63 Mantra
3/36
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
परि॑ ते दू॒डभो॒ रथो॒ऽस्माँ२ऽअ॑श्नोतु वि॒श्वतः॑। येन॒ रक्ष॑सि दा॒शुषः॑॥३६॥

परि॑। ते॒। दू॒डभः॑। दु॒र्दभ॒ऽइति॑ दुः॒ऽदभः॑। रथः॑। अ॒स्मान्। अ॒श्नो॒तु॒। वि॒श्वतः॑। येन॑। रक्ष॑सि। दा॒शुषः॑ ॥३६॥

Mantra without Swara
परि ते दूडभो रथो स्माँ अश्नोतु विश्वतः । येन रक्षसि दाशुषः ॥

परि। ते। दूडभः। दुर्दभऽइति दुःऽदभः। रथः। अस्मान्। अश्नोतु। विश्वतः। येन। रक्षसि। दाशुषः॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वरा, (येन) ज्या ज्ञानाद्वारे तू (दाशुषः) विद्यादींचे दान करणार्‍या विद्वानांची (विश्‍वत:) सर्वदिशांकडून किंवा सर्वत्र (रक्षसि) रक्षा करतोस (ते) तुझे (दूडभ:) दु:ख किंवा आपत्तीनेही नाश पावणारे व (रथ:) सर्वांनी जाणावे असे जे विज्ञान आहे, ते विज्ञान आमचे सर्वथा रक्षण करण्यासाठी (अस्मान्) तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणार्‍या आम्हां उपासकांना (परि) सर्व प्रकारे (अश्‍नोतु) प्राप्त होवो । (तुझ्याकडून ज्ञान आणि विज्ञान मिळण्यासाठी आम्ही याचना करीत आहोत) ॥36॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी विज्ञानाच्या प्राप्तीकरिता सर्वांचे रक्षण करणार्‍या परमेश्‍वराची प्रार्थना करावी आणि त्याचबरोबर नित्य पुरूषार्थ व श्रम केला पाहिजे. यासाठी की ज्यायोगे आम्ही अविद्या, अधर्म आदी दोषांचा त्याग करून उत्तमोत्तम विद्या, धर्म आदी शुभगुणांची प्राप्ती करून सदा आनंदी राहू शकू. ॥36॥
Subject
पुढील मंत्रात परमेश्‍वर कसा आहे, हे सांगितले आहे -