Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 35

63 Mantra
3/35
Devata- सविता देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
तत् स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि। धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥३५॥

तत्। स॒वि॒तुः। वरे॑ण्यम्। भर्गः॑। दे॒वस्य॑। धी॒म॒हि॒। धि॒यः॑। यः। नः॒। प्र॒। चो॒द॒या॒त् ॥३५॥

Mantra without Swara
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयत् ॥

तत्। सवितुः। वरेण्यम्। भर्गः। देवस्य। धीमहि। धियः। यः। नः। प्र। चोदयात्॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सवितु:) सर्व जगाची उत्पत्ती करणार्‍या व (देवस्य) प्रकाशमय, शुद्ध आणि सुखदायक परमेश्‍वराचे (वरण्यम्) अतीश्रेष्ठ (भर्ग:) पापरूप दु:खांना समूळ नष्ट करणारे असे जे (तेज:) स्वरूप आहे (तत्) त्यास आम्ही (धीमहि) धारण करावे (त्याचे ध्यान धरावे) (यः) अंर्तर्यामी असून जो सर्व सुखांचे दान करणारा आहे, असा तो परमेश्‍वर कृपा-करूणा करून (न:) आमच्या (धिय:) बुद्धी आणि विचारांना उत्तमोत्तम गुण, कर्म आणि स्वभाव धारण करण्याकरिता प्रेरणा देवो. ॥35॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी हेच उचित कर्म आहे की जगाची उत्पत्ती करणार्‍या, सर्वांपेक्षा श्रेष्ठ, सर्व दोषांचा नाश करणार्‍या अत्यंत शुद्ध अशा परमेश्‍वराचीच स्तुती करावी, त्यासच प्रार्थना करावी आणि केवळ त्याचीच उपासना करावी. कशाकरितां? या करिता की त्याचे ध्यान आणि त्याची प्रार्थना केल्यानंतर तो आम्हांस वाईट गुणांपासून कर्मापासून दूर ठेवील आणि आम्हांस सद्गुण, सत्कर्म आणि सुस्वभावाकडे प्रवृत्त करील. याशिवाय प्रार्थनेचा प्रमुख सिद्धांत असा आहे की माणसाने जशी प्रार्थना करावी, त्यानुसार त्यासाठी पुरूषार्थ आणि कर्म अवश्य करावेत. ॥35॥
Subject
जगदीश्‍वराची स्तुती, प्रार्थना आणि उपासना कशी करावी, हे पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -