Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 34

63 Mantra
3/34
Devata- इन्द्रो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- पथ्या बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
क॒दा च॒न स्त॒रीर॑सि॒ नेन्द्र॑ सश्चसि दा॒शुषे॑। उपो॒पेन्नु म॑घव॒न् भूय॒ऽइन्नु ते॒ दानं॑ दे॒वस्य॑ पृच्यते॥३४॥

क॒दा। च॒न। स्त॒रीः। अ॒सि॒। न। इ॒न्द्र॒। स॒श्च॒सि॒। दा॒शुषे॑। उपो॒पेत्युप॑ऽउप। इत्। नु। म॒घ॒व॒न्निति॑ मघऽवन्। भूयः॑। इत्। नु। ते॒। दान॑म्। दे॒वस्य॑। पृ॒च्य॒ते॒ ॥३४॥

Mantra without Swara
कदा चन स्तरीरसि नेन्द्र सश्चसि दाशुषे । उपोपेन्नु मघवन्भूय इन्नु ते दानं देवस्य पृच्यते ॥

कदा। चन। स्तरीः। असि। न। इन्द्र। सश्चसि। दाशुषे। उपोपेत्युपऽउप। इत्। नु। मघवन्निति मघऽवन्। भूयः। इत्। नु। ते। दानम्। देवस्य। पृच्यते॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सुखदाता परमेश्‍वरच, तूच (स्तरीः) सर्वांवर सुखाचे आच्छादन करणारे (असि) आहेत,तू जेव्हां (दाशुषे) विद्यादान करणार्‍या मनुष्याला (कदाचन) कधी (इत्) ज्ञान (नु) शीघ्र (सश्‍चसि) देत (न) नाहीस तेव्हां हे (मघवन्) विद्यादान देणार्‍या परमेश्‍वरा, (देवस्य) कर्माचे फळ देणार्‍या (ते) तुझ्याच (दानम्) दिलेल्या (इत्) ज्ञानाने (दाशुषे) विद्यादान करणार्‍या मनुष्याला भूय:) पुन्हा नवीन ज्ञान किंवा त्यात वृद्धी (नु) शीघ्र (उपोपपृच्यते) प्राप्त (कदाचन) कधीही (न) होत नाही. (परमेश्‍वराच्या कृपेनेच ज्ञान मिळते व ज्ञानात शीघ्र वृद्धी होते)॥34॥
Essence
भावार्थ - जगदीश्‍वर कर्मफलप्रदाता आहे. तोच जर कर्माचे फळ देणारा नसता, तर कोणीही प्राण्याला नियम आणि व्यवस्थेत राहून कर्माचे फळ प्राप्त करता आले नसते. (तो फलप्रदाता आहे म्हणून चांगल्या कर्माचे चांगले व वाईट कर्माचे वाईट फळ सर्वांना ईश्‍वरीय व्यवस्थेप्रमाणे मिळत आहे)॥34।
Subject
तो इन्द्र कसा आहे, याविषयी पुढील कथन केले आहे -