Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 32

63 Mantra
3/32
Devata- आदित्यो देवता Rishi- सप्तधृतिर्वारुणिर्ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
न॒हि तेषा॑म॒मा च॒न नाध्व॑सु वार॒णेषु॑। ईशे॑ रि॒पुर॒घश॑ꣳसः॥३२॥

न॒हि। तेषा॑म्। अ॒मा। च॒न। न। अध्व॒स्वित्यध्व॑ऽसु। वा॒र॒णेषु॑। ईशे॑। रि॒पुः। अ॒घश॑ꣳस॒ इत्य॒घऽश॑ꣳसः ॥३२॥

Mantra without Swara
नहि तेषाममा चन नाध्वसु वारणेषु । ईशे रिपुरघशँसः ॥

नहि। तेषाम्। अमा। चन। न। अध्वस्वित्यध्वऽसु। वारणेषु। ईशे। रिपुः। अघशꣳस इत्यधऽशꣳसः॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे ईश्‍वराची उपासना करणारे श्रद्धालु जन आहेत, (तेपाम) त्यांच्या (अभा) घरांत आणि (अध्वसु) वाटेत (वारणेषु) तसेच युद्धप्रसंगात, कोणी चोर, शत्रु, डाकू वाघ आदी त्यांच्यासमोर युद्धात किंवा वाटेत, (चन) देखील थांबू शकत नाहीत, तसेच (अधशंस:) पापकर्म करणारा व त्यासाठी प्रवृत्त करणारा कोणी (रिपु:) शत्रु, ईश- उपासकांसमोर तग धरू शकत नाही. (त्याचा निभाव लागत नाही) (न) कोणी शत्रु त्यांना क्लेश, कष्ट देण्यात सफल होऊ शकत नाही. मी ईशोपासक अशा उपासक धार्मिक विद्वांकडे (ईशे) जाऊ शकतो व (त्यांच्यापासून उपदेश, ज्ञान व भक्ती ग्रहण करण्यात समर्थ होऊ शकतो, कारण मी ईशोपासक आहे) ॥32॥
Essence
भावार्थ - जे लोक धर्मात्मा आहेत, सर्वांवर उपकार करणारे आहेत, त्यांना कुठेही भय-भीती त्रस्त करू शकत नाही. तसेच जो अजातशत्रु मनुष्य आहे, त्याचा कोणी शत्रु नसतो. (जो सर्वांना मित्र मानतो, त्याचा कोणी शत्रु होत नाही व तो अजातशत्रु होऊ शकतो)॥32॥
Subject
पुढील मंत्रात तो परमेश्‍वर कसा आहे, यावषियी उपदेश केला आहे -