Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 29

63 Mantra
3/29
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
यो रे॒वान् योऽअ॑मीव॒हा व॑सु॒वित् पु॑ष्टि॒वर्द्ध॑नः। स नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः॥२९॥

यः। रे॒वान्। यः। अ॒मी॒व॒हेत्य॑मीऽव॒हा। व॒सु॒विदिति॑ वसु॒ऽवित्। पु॒ष्टि॒वर्द्ध॑न॒ इति॑ पुष्टि॒ऽवर्द्ध॑नः। सः। नः॒। सि॒ष॒क्त्विति सिषक्तुः। यः। तु॒रः ॥२९॥

Mantra without Swara
यो रेवान्यो अमीवहा वसुवित्पुष्टिवर्धनः । स नः सिषक्तु यस्तुरः ॥

यः। रेवान्। यः। अमीवहेत्यमीऽवहा। वसुविदिति वसुऽवित्। पुष्टिवर्द्धन इति पुष्टिऽवर्द्धनः। सः। नः। सिषक्त्विति सिषक्तुः। यः। तुरः॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - तो परमेश्‍वर की (य:) जो वेदशास्त्राचा पालनकर्ता व (रेवान्) विद्या आदी धनांनी अनंत समृद्धीमान आहे, (अमीवहा) अविद्या आदी रोगांचा नाश करणारा व करविणारा आहे (वसुवित्) सर्व वस्तूंना यथावत जाणणारा आहे, (पुष्टिवर्द्धन:) पुष्टि म्हणजे शरीर आणि आत्म्याची शक्ती वाढविणारा आहे, तसेच जो (तुर:) शीघ्र उत्तम कर्म करणारा किंवा आम्हांस चांगल्या कर्माकडे शीघ्र प्रवृत्त करणारा आणि उत्तम कर्म करविणारा आहे, (स:) तो परमेश्‍वर (न:) आम्हांला उत्तम कर्मांशी व सद्गुणांशी (सिषक्तु) संयुक्त करो (आम्हांस सदैव श्रेष्ठ कर्म करण्याची व सद्गुण शिकण्याची प्रेरणा देवो, देत राहो) ॥29॥
Essence
भावार्थ - या जगात जे जेवढे धन आहे, ते सर्व जगदीश्‍वराचेच आहे. मुनष्यांनी परमेश्‍वराची प्रार्थना करावी, पण त्या प्रार्थनेप्रमाणे त्यांनी पुरूषार्थ (श्रम आणि प्रयत्न ही) केला पाहिजे. कोणी मनुष्य परमेश्‍वर विद्यादी स्वामी आहे, असे म्हणून वा इतरांचे ऐकून वा परमेश्‍वराचे विशेषण सांगून कृतकृत्य होऊ शकत नाही अथवा विद्या आदी धनांचा अधिपती होऊ शकत नाही. प्रत्येकाने स्वपुरूषार्थाने सतत विद्यादी धनांची वृद्धी आणि सुरक्षा केली पाहिजे. ज्याप्रमाणे परमेश्‍वर अविद्याआदी रोगांचा नाश करणारा आहे, त्याप्रमाणे माणसांनी देखील रोग (दोष) निरंतर दूर केले पाहिजेत, ज्याप्रमाणे परमेश्‍वर वस्तू यथावत जाणतो, त्याप्रमाणे मनुष्यांकरिता हेच योग्य आहे की त्यांनी देखील स्वस्वामर्थ्याप्रमाणे सर्व पदार्थ व पदार्थ-विद्या यथावत जाणाव्या. जसे तो परमेश्‍वर सर्वांना पुष्टी देतो, तसेच मनुष्यांनी देखील सर्वांच्या पुष्टी आदी गुणांना निरंतर वाढवावे (सर्वांना पोषण देऊन सर्वांना निरोगी ठेवण्यासाठी यत्न करावेत) जसे तो जगदीश्‍वर (जीवांच्या कल्याणासाठी उपकारक असे) श्रेष्ठ कर्म शीघ्र व अवश्य करतो, तद्वत मनुष्यांनी उत्तम कर्म करण्यात त्वरा करावी. जसे आम्ही उत्तम कर्म करण्याकरीता परमेश्‍वराची प्रार्थना करतो, तसेच परमेश्‍वर देखील आम्हां सर्व मनुष्यांना श्रेष्ठ पुरूषार्थाद्वारे उत्तम कर्म करण्याची उत्तम गुण धारण करण्याची व श्रेष्ठ आचरणाची प्रेरणा देवो. (आम्ही सदैव उत्तम कर्म, गुण व आचरण करीत राहू, अशी कृपा करो) ॥29॥
Subject
तो ईश्‍वर कसा आहे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -