Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 27

63 Mantra
3/27
Devata- अग्निर्देवता Rishi- श्रुतबन्धुर्ऋषिः Chhand- विराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
इड॒ऽएह्यदि॑त॒ऽएहि॒ काम्या॒ऽएत॑। मयि॑ वः काम॒धर॑णं भूयात्॥२७॥

इडे॑। आ। इ॒हि॒। अदि॑ते। आ। इ॒हि॒। काम्याः॑। आ। इ॒त॒। मयि॑ वः॒। का॒म॒धर॑ण॒मिति॑ काम॒ऽधर॑णम्। भू॒या॒त् ॥२७॥

Mantra without Swara
इडऽएह्यदित एहि काम्या एत । मयि वः कामधरणम्भूयात् ॥

इडे। आ। इहि। अदिते। आ। इहि। काम्याः। आ। इत। मयि वः। कामधरणमिति कामऽधरणम्। भूयात्॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - परमेश्‍वरा, तुझ्या कृपेने मला (इडे) हा पृथ्वी राज्य करण्यासाठी (एहि) अवश्यमैव प्राप्त व्हावी. तसेच (अदिते) सर्वसुखदायिनी अविनाशी राजनीतीद्वारे मला (काम्या:) इच्छित पदार्थांची (एत) प्राप्ती व्हावी. (मयि) माझ्याकडे आलेली ही (व:) ती राज्यादी पदार्थांची संपदा (कामधरणम्) उपकारकरीत्या स्थिर व स्थायी राहावी. ॥27॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी निरंतर उत्तमोत्तम पदार्थांची कामना करीत त्यांच्या प्राप्तीसाठी परमेश्‍वराची प्रार्थना करावी आणि त्याप्रमाणे सदा पुरूषार्थ-परिश्रम करावे. कोणीही माणूस चांगली वा वाईट कामना केल्याशिवाय क्षणभर देखील राहू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी अधर्मयुक्त व्यवहार करण्याच्या कामनेचा त्याग करावा आणि धर्मयुक्त व्यवहार जितके करतां येतील, तेवढे करावेत. ॥27॥
Subject
परमेश्‍वराची प्रार्थना का करावी, या विषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -