Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 24

63 Mantra
3/24
Devata- अग्निर्देवता Rishi- वैश्वामित्रो मधुच्छन्दा ऋषिः Chhand- विराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
स नः॑ पि॒तेव॑ सू॒नवेऽग्ने॑ सूपाय॒नो भ॑व। सच॑स्वा नः स्व॒स्तये॑॥२४॥

सः। नः॒। पि॒तेवेति॑ पि॒ताऽइ॑व। सू॒नवे॑। अग्ने॑। सू॒पा॒य॒न इति॑ सुऽउ॒पा॒य॒नः। भ॒व॒। सच॑स्व। नः॒। स्व॒स्तये॑ ॥२४॥

Mantra without Swara
स नः पितेव सूनवे ग्ने सूपायनो भव । सचस्वा नः स्वस्तये ॥

सः। नः। पितेवेति पिताऽइव। सूनवे। अग्ने। सूपायन इति सुऽउपायनः। भव। सचस्व। नः। स्वस्तये॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) परमेश्‍वरा, ज्याप्रमाणे (सूनवे) आपल्या पुत्राला (पितेव) एक पिता सद्गुणांची शिकवण देतो, त्याप्रमाणे तू (न:) आम्हांस (सूपायन:) श्रेष्ठ ज्ञान देणारा (भव) हो. (स:) तू कृपा करून (न:) आम्हाला (स्वस्तये) सुखाशी (सचस्व) संयुक्त ठेव. (तुझ्या कृपेने आम्ही सुखी असावे) ॥24॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकाराचा प्रयोग केला आहे. (मंत्रात परमेश्‍वराला प्रार्थना केली आहे की) हे सर्वांचे पालन करणार्‍या ईश्‍वरा, ज्याप्रमाणे एक कृपाशील विद्वान मनुष्य आपल्या पुत्राचे रक्षण करतो, श्रेष्ठ ज्ञान देऊन त्यास विद्या, धर्म, सुखभाव आणि सत्य विद्या आदी गुणांशी संयुक्त करतो, त्याच प्रमाणे तूही कृपा करून आमचे निरंतर रक्षण कर आणि आम्हांला श्रेष्ठ आचरण, व्यवहारादीमधे निरंतर ठेव. (आम्ही सदैव सदाचारी आणि सकुशल राहावे, अशी कृपा कर) ॥24॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वराविषयी सांगितले आहे -