Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 21

63 Mantra
3/21
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- याज्ञवल्क्यः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
रेव॑ती॒ रम॑ध्वम॒स्मिन् योना॑व॒स्मिन् गो॒ष्ठेऽस्मिँल्लो॒केऽस्मिन् क्षये॑। इ॒हैव स्त॒ माप॑गात॥२१॥

रेव॑तीः। रम॑ध्वम्। अ॒स्मिन्। योनौ॑। अ॒स्मिन्। गो॒ष्ठे। गो॒स्थ इति॑ गो॒ऽस्थे॑। अ॒स्मिन्। लो॒के। अ॒स्मिन्। क्षये॑। इ॒ह। ए॒व। स्त॒। मा। अप॑। गा॒त॒ ॥२१॥

Mantra without Swara
रेवती रमध्वमस्मिन्योनावस्मिन्गोष्ठे स्मिँल्लोके स्मिन्क्षये । इहैव स्त मापगात ॥

रेवतीः। रमध्वम्। अस्मिन्। योनौ। अस्मिन्। गोष्ठे। गोस्थ इति गोऽस्थे। अस्मिन्। लोके। अस्मिन्। क्षये। इह। एव। स्त। मा। अप। गात॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, श्रेष्ठ नीती व आचरणाद्वारे प्राप्त जे (रेवती:) विद्या, धन, इन्द्रियें, पशू, जगतीचे राज्य आदी पदार्थ (स्त) आहेत, ते सर्व (अस्मिन) तुमच्या या (योमौ) जन्मस्थळात, अस्मिन्गोष्ठे) तुमच्या या इंद्रियामधे अथवा गौ आदी पशूंच्या राहण्याचे ठिकाण आहे. (अस्मिन्लोके) अथवा या जगात (अस्मिन् क्षये) तुम्ही बांधलेल्या या घरामधे राहून (राध्वम्) तुम्ही त्यात आनंदाने वास्तव्य करा. अशा सुखी जीवनाची आकांक्षा करीत तुम्ही (इहैव) या वरील स्थानात (जन्मस्थळ, गाईंचे गोठे, घर) सुखेन निवास करा. वाधीद्यी (मापनात) या स्थानांपासून दूर जाऊ नका.॥21॥
Essence
भावार्थ- जेथे विद्वज्जन राहतात, तेथें प्रजेला/लोकांना विद्या, उत्तम ज्ञान आणि धन मिळत असते आणि तेथेच सदैव सुख नांदते. त्यामुळे मनुष्यांनी नेहमी इच्छा करावी की विद्वानांशी आमची नित्य संगती घडावी, म्हणजे आम्हांमधे कधीही भेदभाव व परस्परात विरोध उत्पन्न होऊ नये.॥21॥
Subject
पुढील मंत्रात विद्वानांच्या सम्मान-सत्काराविषयी उपदेश केला आहे -