Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 20

63 Mantra
3/20
Devata- आपो देवता Rishi- याज्ञवल्क्यः Chhand- भूरिक् बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
अन्ध॒ स्थान्धो॑ वो भक्षीय॒ मह॑ स्थ॒ महो॑ वो भक्षी॒योर्ज॒ स्थोर्जं॑ वो भक्षीय रा॒यस्पोष॑ स्थ रा॒यस्पोषं॑ वो भक्षीय॥२०॥

अन्धः॑। स्थ॒। अन्धः॑। वः॒। भ॒क्षी॒य॒। महः॑। स्थ॒। महः॑। वः॒। भ॒क्षी॒य॒। ऊ॒र्जः॑। स्थ॒। ऊर्ज्ज॑म्। वः॒। भ॒क्षी॒य॒। रा॒यः। पोषः॑। स्थ॒। रा॒यः। पोष॑म्। वः॒। भ॒क्षी॒य॒ ॥२०॥

Mantra without Swara
अन्ध स्थान्धो वो भक्षीय मह स्थ महो वो भक्षीयोर्ज स्थोर्जँवो भक्षीय रायस्पोष स्थ रायस्पोषँवो भक्षीय ॥

अन्धः। स्थ। अन्धः। वः। भक्षीय। महः। स्थ। महः। वः। भक्षीय। ऊर्जः। स्थ। ऊर्ज्जम्। वः। भक्षीय। रायः। पोषः। स्थ। रायः। पोषम्। वः। भक्षीय॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जगात जे जे (अंध:) बलवान वृक्ष (वनस्पती) किंवा औषधी आदी पदार्थ (स्थ) आहेत, (व:) त्यांच्या प्रकाशाने (म्हणजे त्यांच्या गुणांचे ज्ञान घेऊन व त्यांना प्राप्त करून) मी (अंध:) वीर्यवर्धक (शक्ती, ओज आणि सामर्थ्य देणार्‍या) अन्नाचे (भक्षीय) सेवन करावे. तसेच जे जे (मह:) वायु, अग्नी आदी महान पदार्थ (स्व) आहेत, (व:) त्यांच्यापासून मी (यह:) महान, अतीमहान् क्रियांची सिद्धी करणारे शिल्पादी कर्म (भक्षीय) करावेत. (ऊर्ज:) संसारात जे जे जल, दूध, तूप मिष्टान्न अथवा फळे आदी रसवान पदार्थ (स्थ) आहेत (व:) त्यांच्यापासून (ऊर्जम्) पराक्रम व सामर्थ्य देणारे रस घेऊन मी त्यां रसाचा (भक्षयि) उपभोग घ्यावा त्याचप्रमाणे (रायस्पोष:) अनेक गुणवान जे जे पदार्थ (स्थ) आहेत, (व:) त्यांच्यापासून योग्य ते लाभ घेत चक्रवर्ती राज्य अथवा श्रीची प्राप्ती करीत मी (रायस्पोषम्) उत्तमोत्तम धनांचा (भक्षीय) उपभोग घ्यावा. ॥20॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी जगातील पदार्थांच्या गुणांचे ज्ञान मिळवावे व त्या पदार्थापासून होणार्‍या उपकारांचे (लाभांचे) ग्रहण करावे आणि अशा प्रकारे सर्व आनंदाचा उपभोग घ्यावा. (भौतिक विज्ञानतंत्र-यंत्र आदीमधे शोध, आविष्कार करून भौतिक सुख मिळवावे ) ॥20॥
Subject
पुढील मंत्रात यज्ञाद्वारे शुद्ध होणार्‍या/केलेल्या औषधी आदी पदार्था विषयी उपदेण केला आहे -