Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 2

63 Mantra
3/2
Devata- अग्निर्देवता Rishi- सुश्रुत ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
सुस॑मिद्धाय शो॒चिषे॑ घृ॒तं ती॒व्रं जु॑होतन। अ॒ग्नये॑ जा॒तवे॑दसे॥२॥

सुस॑मिद्धा॒येति सुऽस॑मिद्धाय। शो॒चिषे॑। घृ॒तम्। ती॒व्रम्। जु॒हो॒त॒न॒। अ॒ग्नये॑। जा॒तवे॑दस॒ इति॑ जा॒तऽवे॑दसे ॥२॥

Mantra without Swara
सुसमिद्धाय शोचिषे घृतन्तीव्रं जुहोतन । अग्नये जातवेदसे ॥

सुसमिद्धायेति सुऽसमिद्धाय। शोचिषे। घृतम्। तीव्रम्। जुहोतन। अग्नये। जातवेदस इति जातऽवेदसे॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे याज्ञिकजनहो, तुम्ही (सुसमिद्धाय) चांगल्या प्रकारे पेटलेल्या व प्रकाश देणार्‍या (शोचिषे) शुद्ध करणार्‍या आणि दोषांचे निवारण करणार्‍या (जातवेदसे) सर्व पदार्थामधे विद्यमान असणार्‍या (अग्नेय) रूप, दाह, प्रकाश, छेदन आदी गुणांना धारण करणार्‍या अग्नीमधे (तीव्रम्) सर्व दोष तीव्रतेने व शीघ्रदूर करण्यास समर्थ (घृतम्) तूप, मिष्टान्न आदी पदार्थ (जुहोतम) यज्ञाग्नीत टाका. ॥2॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी दोषांचा शीघ्र-नाश करणार्‍या आणि स्वच्छ केलेल्या पदार्थांची या प्रज्वलित अग्नीमधे आहुती द्यावी आणि त्याद्वारे इच्छित सुख प्राप्त करावेत. ॥2॥
Subject
तो भौतिक अग्नी कसा आहे आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -