Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 18

63 Mantra
3/18
Devata- अग्निर्देवता Rishi- अवत्सार ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
इन्धाना॑स्त्वा श॒तꣳ हिमा॑ द्यु॒मन्त॒ꣳ समि॑धीमहि। वय॑स्वन्तो वय॒स्कृत॒ꣳ सह॑स्वन्तः सह॒स्कृत॑म्। अग्ने॑ सपत्न॒दम्भ॑न॒मद॑ब्धासो॒ऽअदा॑भ्यम्। चित्रा॑वसो स्व॒स्ति ते॑ पा॒रम॑शीय॥१८॥

इन्धा॑नाः। त्वा॒। श॒तम्। हिमाः॑। द्यु॒मन्त॒मिति॑ द्यु॒ऽमन्त॑म्। सम्। इ॒धी॒म॒हि॒। वय॑स्वन्तः। व॒य॒स्कृत॑म्। व॒य॒स्कृत॒मिति॑ वयः॒ऽकृत॑म्। सह॑स्वन्तः। स॒ह॒स्कृत॑म्। स॒ह॒स्कृत॒मिति॑ सहः॒ऽकृत॑म्। अग्ने॑। स॒प॒त्न॒दम्भ॑न॒मिति॑ सपत्न॒ऽदम्भ॑नम्। अद॑ब्धासः। अदा॑भ्यम्। चित्रा॑वसो। चि॑त्रवसो॒ऽइति॒ चित्र॑ऽवसो। स्व॒स्ति। ते। पा॒रम्। अ॒शी॒य॒ ॥१८॥

Mantra without Swara
इन्धानास्त्वा शतँ हिमा द्युमन्तँँ समिधीमहि । वयस्वन्तो वयस्कृतँँ सहस्वन्तः सहस्कृतम् । अग्ने सपत्नदम्भनमदब्धासोऽअदाभ्यम् । चित्रावसो स्वस्ति ते पारमशीय ॥

इन्धानाः। त्वा। शतम्। हिमाः। द्युमन्तमिति द्युऽमन्तम्। सम्। इधीमहि। वयस्वन्तः। वयस्कृतम्। वयस्कृतमिति वयःऽकृतम्। सहस्वन्तः। सहस्कृतम्। सहस्कृतमिति सहःऽकृतम्। अग्ने। सपत्नदम्भनमिति सपत्नऽदम्भनम्। अदब्धासः। अदाभ्यम्। चित्रावसो। चित्रवसोऽइति चित्रऽवसो। स्वस्ति। ते। पारम्। अशीय॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (चित्रावसो) अद्भुत संपदेचे स्वामिन्, हे (अग्ने) परमेश्‍वर, आम्ही (अदब्धास:) दंभ, अहंकार आणि हिंसादी दोषापासून दूर (वयस्वंत:) इच्छित दीर्घायुची कामना करीत (सहस्नंत:) अत्यंत सहनशील स्वभावाचे होऊन तुमची उपासना करू (अदाभ्यम्) तुम्ही व (सपत्नदंभनभ्) आमच्या शत्रूंचा नाश करणारे (वयस्कृतम्) दीर्घ आयु व उत्तम दशा प्राप्त करून देणारे (सहस्कृतम्) सहन शक्ती असणारे आणि (घुमंतम्) अनंत प्रकाशमान आहांत (त्वा) (इन्धाना:) तुमचा उपदेश ऐकत आणि तुमची स्तुती करीत आम्ही (शतं) शंभर वर्ष किंवा त्याहून अधिक (हिमा:) हेमंत आदी ऋतूंनी युक्त अशा शताधिरू वर्षापर्यंत (समिधीमहि) आपले जीवन उजळीत राहू, (कीर्तीमान जीवन जगू) व मी तुमचा उपासक देखील (ते) तुमच्या कृपेने समस्त दु:खांना (पारम्) पार करून (स्वस्ती) सुखाला (अशीय) प्राप्त करीन, असे व्हावे ॥1॥^दुसरा अर्थ (अग्निपरक) - हे परमेश्‍वर, (अदब्धास:) दंभ, अहंकार व हिंसादी दोषांपासून दूर राहून (वयस्वंत:) दीर्घायूची कामना करणारे आम्ही (सहस्वंत:) अत्यंत सहनशील होऊन (त्वा) त्या भौतिक अग्नीचा उपयोग घेत राहू. तो अग्नी (अदाभ्यम्) उपभोग घेण्यास योग्य असून (सपत्नदंभनम्) आग्नेयादी शस्त्रांचे कारण आहे व त्यांद्वारे आम्हांला शत्रूंवर विजय मिळवून देणारा आहे (वयस्कृतं) आयुष्य व जीवन देणारा असून (सहस्कृतम्) सहनशक्ती शिकविणारा व (घुमन्तम्) दीप्तीमान प्रकाशयुक्त अशा (अग्ने) कार्यसिद्धी देणार्‍या अग्नीला (इन्धाना:) प्रज्वलित करीत आम्ही (शतम्) शंभर वर्षापर्यंत (हिमा:) हेमंत आदी ऋतूंनी युक्त अशा शंभर वर्षा पर्यंत (समिधीमहि) आम्ही कीर्तीमंत जीवन जगू. अशाच प्रकारे मी याज्ञिक (चित्रावसी) अगणित विविध धनसंपदा देणार्‍या अग्नीच्या (ते) त्या प्रकाशाने दारिद्य्र आदी दु:खांना (पारम्) जिंकून (स्वस्ति) आत्यंतिक सुखाला (अशीय) प्राप्त करू शकेल, असे व्हावे. ॥2॥ ॥8॥
Essence
भावार्थ- या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. मनुष्यांनी आपल्या पुरूषार्थाद्वारे अग्नी आदी पदार्थांपासून योग्य तो उपभोग घ्यावा व दु:खापासून मुक्त होऊन उत्तमोत्तम सुखांची प्राप्ती करीत शंभर वर्षापर्यंत आनंदाने जगावे. जीवनातील एकही क्षण निरूद्योगित्व व आलस्यात घालवू नये. या उलट ज्यायोगे पुरूषार्थ, क्षमादी करणार्‍या वृत्तीत वृद्धी होईल, असेच प्रयत्न सदैव करावेत. ॥18॥
Subject
पुनश्‍च, पुढील मंत्रात परमेश्‍वर आणि अग्नी याविषयी कथन केले आहे -