Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 17

63 Mantra
3/17
Devata- अग्निर्देवता Rishi- अवत्सार ऋषिः Chhand- त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
त॒नू॒पाऽअ॑ग्नेऽसि त॒न्वं मे पाह्यायु॑र्दाऽअ॑ग्ने॒ऽस्यायु॑र्मे देहि वर्चो॒दाऽअ॑ग्नेऽसि॒ वर्चो॑ मे देहि। अग्ने॒ यन्मे॑ त॒न्वाऽऊ॒नं तन्म॒ऽआपृ॑ण॥१७॥

त॒नू॒पा इति॑ तनू॒ऽपाः। अ॒ग्ने॒। अ॒सि॒। त॒न्व᳖म्। मे॒। पा॒हि॒। आ॒यु॒र्दा इत्यायुः॒दाः। अ॒ग्ने॒। अ॒सि॒। आयुः॑। मे॒। दे॒हि॒। व॒र्च्चो॒दा इति॑ वर्च्चः॒ऽदाः। अ॒ग्ने॒। अ॒सि॒। वर्च्चः॑। मे॒। दे॒हि॒। अग्ने॑। यत्। मे॒। त॒न्वाः᳖ ऊ॒नम्। तत्। मे॒। आ। पृ॒ण॒ ॥१७॥

Mantra without Swara
तनूपाऽअग्नेसि तन्वम्मे पाह्यायुर्दा अग्ने स्यायुर्मे देहि वर्चादाऽअग्ने सि वर्चा मे देहि । अग्ने यन्मे तन्वाऽऊनन्तन्मे आ पृण ॥

तनूपा इति तनूऽपाः। अग्ने। असि। तन्वम्। मे। पाहि। आयुर्दा इत्यायुःदाः। अग्ने। असि। आयुः। मे। देहि। वर्च्चोदा इति वर्च्चःऽदाः। अग्ने। असि। वर्च्चः। मे। देहि। अग्ने। यत्। मे। तन्वाः ऊनम्। तत्। मे। आ। पृण॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) जगदीश्‍वर, (यत्) ज्याअर्थी तूच (तनूपा:) सर्व मूर्त पदार्थांच्या शरिराचा रक्षक (असि) आहेस, त्या अर्थी तुला मी प्रार्थना करतो की (मे) तू माझ्या (तन्वम्) शरिराचे ही रक्षण कर. हे (अग्ने) परमेश्‍वरा, तूच (आयुर्दा:) सर्वांना जीवन देणारा (असि) आहेस. (मे) मला (आयु:) पूर्ण आयु म्हणजे शंभर वर्षार्यंत आयुष्य (देट्टि) दे. हे (अग्ने) सर्वविद्यामय परमेश्‍वरा, तू (वर्वोदा:) सर्व मनुष्यांना विज्ञान (विशेषज्ञान) देणारा (असि) आहेस. (मे) मला देखील सद्गुणांचे व पदार्थाचे ज्ञान देणारी (वर्च:) पूर्ण विद्या (देहि) दे. हे (अग्ने) सर्व प्रार्थित कार्याची पूर्ती करणार्‍या परमेश्‍वरा, (मे) माझ्या (तन्वा:) देहामधे (यत्) जितकी जेवढी (उनम्) बुद्धी शक्ती आणि शौर्यादी गुणांची उणीव आहे, (तत्) ती तेवढी (मे) माझ्या शरीरात (आपृण) भरून वाढ (माझ्यात बुद्धी शक्तीच्या दृष्ट्या पूर्णत्व येऊ दे) ॥1॥ दुसरा अग्नीपरक अर्थ असा - (अग्ने) हा भौतिक अग्नी (यत्) ज्याप्रमाणे (तनूपा:) पदार्थांच्या सुरक्षेचा हेतू (असि) आहे, त्याप्रमाणे, हाच अग्नी माझ्यातील जाठराग्नीरूपाने (मे) माझ्या (तन्वम्) शरीराचे रक्षण करतो. (अग्ने) ज्याप्रमाणे ज्ञानाचे कारण असलेला हा अग्नी (आयुर्दा:) सर्वांच्या जीवनाचे कारण (असि) आहे, त्याप्रमाणे अग्नी (मे) माझ्यासाठी सुद्धा (आयु:) जीवनाचे हेतू जे भूक आदी गुण आहेत, ते गुण (देहि) मला देतो. (अग्ने) हा अग्नी (वर्च्चोदा:) विज्ञानप्राप्तीचा हेतू (अग्नी) आहे, हा (मे) मला देखिल (वर्च्च:) विद्या प्राप्त करण्याकरिता बुद्धी आणि बळ (देहि) देतो. अग्नी) कामना पूर्ण करण्यास समर्थ असा जो हा भौतिक अग्नी आहे, तो (यत्) जितके जेवढे (मे) माझ्या (तन्वा:) शरीरात बुद्धी आदींचे सामर्थ्य (ऊनम्) कमी आहे, (तत्) तितके तेवढे सामर्थ्यादी गुण मला देऊन (आपृण) माझ्यातील अपूर्णत्वास पूर्ण करतो. ॥2॥ ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. परमेश्‍वराचे या संसारात सर्व प्राण्यांना शरीर रक्षण व जीवन-पोषणाच्या दृष्टीने विद्यांचे ज्ञान दिले आहे आणि शरिरातील अंग-अवयवांना शक्ती व पूर्णत्व दिले आहे. यामुळेच सर्व पदार्थ प्राण्यासाठी आपले स्वरूप आणि गुणांना धारण करतात (समर्थ व पूर्ण अंगांनी पदार्थातील गुणांचा लाभ पाण्यांना घेता येईल, अशी पदार्थांची रचना आहे) त्याचप्रमाणे परमेश्‍वर रचित या सृष्टीत अग्नी हा आपल्या प्रकाशादी गुणांमुळे सर्व पदार्थांच्या पालन, अस्तित्वादीचे प्रमुख साधन आहे. ॥17॥
Subject
ईश्‍वर व भौतिक अग्नी काय करतात, या विषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -