Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 14

63 Mantra
3/14
Devata- अग्निर्देवता Rishi- देववातभरतावृषी Chhand- निचृत् अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒यं ते॒ योनि॑र्ऋ॒त्वियो॒ यतो॑ जा॒तोऽअरो॑चथाः। तं जा॒नन्न॑ग्न॒ऽआरो॒हाथा॑ नो वर्द्धया र॒यिम्॥१४॥

अ॒यम्। ते॒। योनिः॑। ऋ॒त्वियः॑। यतः॑। जा॒तः। अरो॑चथाः। तम्। जा॒नन्। अ॒ग्ने॒। आ। रो॒ह॒। अथ॑। नः॒। व॒र्द्ध॒य॒। र॒यिम् ॥१४॥

Mantra without Swara
अयन्ते योनिरृत्वियो यतो जातो अरोचथाः । तञ्जानन्नग्नऽआरोहाथा नो वर्धया रयिम् ॥

अयम्। ते। योनिः। ऋत्वियः। यतः। जातः। अरोचथाः। तम्। जानन्। अग्ने। आ। रोह। अथ। नः। वर्द्धय। रयिम्॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अग्ने) हे जगदीश्‍वर (ते) तुमच्या सृष्टीमधे (ऋत्विय:) प्रत्येक ऋतूंत प्राप्त करण्यास योग्य (नेहमी उपयोगी पडणारा असा जो अग्नी वायू द्वारे (जात:) उत्पन्न होऊन (आरोचथा:) सर्व प्रकारे सर्वत्र प्रकाश देतो, अथवा जो अग्नी सूर्यरूपाने प्रकाशित होऊन सर्व लोकांना प्रगती व उन्नती देतो (लोक व पदार्थ यांची वृद्धी करतो) तसेच जो अग्नी (न:) आमच्या (रयिक्) राज्य आदी समृद्धीस वाढवितो, (तम्) त्या अग्नीला (जानन्) आम्ही जाणावे, असे करा. व याप्रकारे आम्ही भूगोलावर राज्य करून प्राप्त केलेल्या संपदेला (वर्द्धय) आपण वृद्धींगत करा. ॥14॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी अग्नीचा सर्वकाल यथोचित उपयोग घ्यावा. वायू या कारणातून उत्पन्न होणारा व अनेक कार्यांत सिद्धी देणारा हा अग्नी सर्वांना सुख देतो. मनुष्यांनी अशा या अग्नीला यथावत् जाणारे व त्याचा उपयोग (प्रयोग व शोध) करून सर्व कार्यांची प्राप्ती करावी. ॥14॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वर आणि भौतिक अग्नी, यांविषयी उपदेश केला आहे -