Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 11

63 Mantra
3/11
Devata- अग्निर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒प॒प्र॒यन्तो॑ऽअध्व॒रं मन्त्रं॑ वोचेमा॒ग्नये॑। आ॒रेऽअ॒स्मे च॑ शृण्व॒ते॥११॥

उ॒प॒प्र॒यन्त॒ इत्यु॑पऽप्र॒यन्तः॑। अ॒ध्व॒रम्। मन्त्र॑म्। वो॒चे॒म॒। अ॒ग्नये॑। आ॒रे। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। च॒ शृ॒ण्व॒ते ॥११॥

Mantra without Swara
उपप्रयन्तोऽअध्वरं मन्त्रँवोचेमाग्नये । आरेऽअस्मे च शृण्वते ॥

उपप्रयन्त इत्युपऽप्रयन्तः। अध्वरम्। मन्त्रम्। वोचेम। अग्नये। आरे। अस्मेऽइत्यस्मे। च शृण्वते॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अध्वरम्) यज्ञाच्या प्रक्रियेला व पद्धतीला (उपप्रयन्त:) चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आम्ही (अस्मे) जो ईश्‍वर आमच्यापासून (आरे) दूर आहे व (च) जवळ आहे, त्या (श्रृण्वते) सत्यासत्य जाणणार्‍या व प्रार्थना ऐकणार्‍या मंत्राचा आम्ही नित्य... (अग्नेय) विज्ञानरूप अंतर्यासी जगदीश्‍वर (मंत्रम्) ज्ञानदायक (वोचम) उच्चार करू. तसेच त्या मंत्राचा अर्थावर विचार करीत मंत्राद्वारे परमेश्‍वराची प्रार्थना करू. ॥11॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी वेदमंत्राद्वारे ईश्‍वराची स्तुती करावी व यज्ञाचे अनुष्ठान करावे. परमेश्‍वर आंत-बाहेर, सर्व ठिकाणी व्याप्त असून तो माणसाच्या सर्व व्यवहार-विचारांना जाणतो, त्यामुळे अशा सर्वव्यापी व अंतर्यामी ईश्‍वरापासून माणसाने सदैव भय मानावे व अधर्म कार्य करण्याची इच्छा देखील कधी करू नये. जेव्हा ही भावना (की ईश्‍वर सर्वव्यापक व अंतर्यामी आहे) माणसाच्या मनात असते, तेव्हां तो ईश्‍वर त्याच्याजवळ आहे, असे जाणावे, आणि जेव्हां त्यास विसरून अधर्म करतो, तेव्हां ईश्‍वर त्याच्यापासून दूर असतो. असे अवश्य जाणावे ॥11॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वराने आपल्या स्वरूपाचे वर्णन केले आहे -