Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 10

63 Mantra
3/10
Devata- पूर्वार्द्धस्याग्निरुत्तरार्द्धस्य सूर्यश्च देवते Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री,भूरिक् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
स॒जूर्दे॒वेन॑ सवि॒त्रा स॒जू रात्र्येन्द्र॑वत्या। जु॒षा॒णोऽअ॒ग्निर्वे॑तु॒ स्वाहा॑। स॒जूर्दे॒वेन॑ सवि॒त्रा स॒जूरु॒षसेन्द्र॑वत्या। जु॒षा॒णः सूर्यो॑ वेतु॒ स्वाहा॑॥१०॥

स॒जूरिति॑ स॒ऽजूः। दे॒वेन॑। स॒वि॒त्रा। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। रात्र्या॑। इन्द्र॑व॒त्येतीन्द्र॑ऽवत्या। जु॒षा॒णः। अ॒ग्निः। वे॒तु॒। स्वाहा॑। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। दे॒वेन॑। स॒वि॒त्रा। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। उ॒षसा। इन्द्र॑व॒त्येतीन्द्र॑ऽवत्या। जु॒षा॒णः। सूर्यः॑। वे॒तु॒। स्वाहा॑ ॥१०॥

Mantra without Swara
सजूर्देवेन सवित्रा सजू रात्र्येन्द्रवत्या । जुषाणो अग्निर्वेतु स्वाहा । सजूर्देवेन सवित्रा सजूरुषसेन्द्रवत्या । जुषाणः सूर्यो वेतु स्वाहा ॥

सजूरिति सऽजूः। देवेन। सवित्रा। सजूरिति सऽजूः। रात्र्या। इन्द्रवत्येतीन्द्रऽवत्या। जुषाणः। अग्निः। वेतु। स्वाहा। सजूरिति सऽजूः। देवेन। सवित्रा। सजूरिति सऽजूः। उषसा। इन्द्रवत्येतीन्द्रऽवत्या। जुषाणः। सूर्यः। वेतु। स्वाहा॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अग्नी:) हा भौतिक अग्नी (देवेन) सर्व जगाला ज्ञान देणार्‍या (सवित्रा) सर्वोत्पादक परमेश्‍वराने उत्पन्न केलेल्या या जगात (सजू:) सर्वत्र व सर्वांसह विद्यमान आहे. (अग्नी परमेश्‍वराची रचना आहे.) तोच (जुपाण:) सर्व पदार्थांशी संयुक्त होऊन (इन्द्रवत्या) विद्युत रूपाने (रात्र्या) अंधकारमय रात्रीत (स्वाहा) ????? (वेतु) सर्वांना प्रकाश देत व्याप्त आहे. (सूर्य:) सूर्यलोक (देवेन) सर्वांना प्रकाश व प्रेरणा देणार्‍या (सवित्रा) अंतर्यामी परमेश्‍वराने धारण केलेल्या जगासह (संजू:) सर्वांसह विद्यमान आहे. अग्नी (जुषाण:) सर्वांसह राहून व (इन्द्रवत्या) सूर्यप्रकाशाशी संयुक्त होऊन (उषसा) दिवसाच्या प्रारंभी उष:काळी (स्वाहा) अग्नीत टाकलेल्या आहुतीचे (जुषाण:) सेवन करतो आणि सर्वत्र व्याप्ती होऊन हव्य पदार्थांना (वेतु) देश-देशांतरा पर्यंत नेतो, त्या अग्नीचा सर्वांनी योग्य उपयोग करीत सर्व व्यवहार सिद्ध करावेत.॥10॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, परमेश्‍वराने तुमच्या हिताकरितां ज्या भौतिक अग्नीची रचना केली आहे, तो आपल्या सामर्थ्यासह विविध रूप धारण करतो, (अनेक पदार्थामधे विद्युत, आग, दीपक आदी रूपाने विद्यमान असतो) तो अग्नी दीपक होऊन रात्रीच्या अंश्रकारात देखील सर्वांना कामें करण्यास सहाय्यभूत होतो. तसेच तोच अग्नी प्रात:काळी किंवा उष:काळी येऊन सर्व मूर्तिमान, साकार पदार्थांना प्रकाशित करतो, त्यामुळे सर्वजण आपले काम, व्यवहारादी पूर्ण करण्यास समर्थ होतात. मनुष्यांनो, तुम्ही अशा या गुणवान अग्नीला जाणा (व त्यापासून योग्य लाभ घ्या.)॥10॥
Subject
भौतिक अग्नी आणि सूर्य कोणाच्या सत्तेने विद्यमान आहेत, पुढील मंत्रात याविषयीचा उपदेश केला आहे -