Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 8

60 Mantra
29/8
Devata- सरस्वती देवता Rishi- बृहदुक्थो वामदेव्य ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ॒दि॒त्यैर्नो॒ भार॑ती वष्टु य॒ज्ञꣳ सर॑स्वती स॒ह रु॒द्रैर्न॑ऽआवीत्।इडोप॑हूता॒ वसु॑भिः स॒जोषा॑ य॒ज्ञं नो॑ देवीर॒मृते॑षु धत्त॥८॥

आ॒दि॒त्यैः। नः॒। भार॑ती। व॒ष्टु॒। य॒ज्ञम्। सर॑स्वती। स॒ह। रु॒द्रैः। नः॒। आ॒वी॒त्। इडा॑। उप॑हू॒तेत्युप॑ऽहूता। वसु॑भि॒रिति॒ वसु॑ऽभिः। स॒जोषा॒ इति॑ स॒ऽजोषाः॒। य॒ज्ञम्। नः॒। दे॒वीः॒। अ॒मृते॑षु। ध॒त्त॒ ॥८ ॥

Mantra without Swara
आदित्यैर्ना भारती वष्टु यज्ञँ सरस्वती सह रुद्रैर्नऽआवीत् । इडोपहूता वसुभिः सजोषा यज्ञन्नो देवीरमृतेषु धत्त ॥

आदित्यै। नः। भारती। वष्टु। यज्ञम्। सरस्वती। सह। रुद्रैः। नः। आवीत्। इडा। उपहूतेत्युपऽहूता। वसुभिरिति वसुऽभिः। सजोषा इति सऽजोषाः। यज्ञम्। नः। देवीः। अमृतेषु। धत्त॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (आदित्यैः) पूर्ण विद्यावान अशा उत्तम कोटीच्या विद्वानांनी शिकवलेली (उपहूता) यथोचित निर्धाराने त्या विद्वानाकडून ग्रहण केलेली (भारती) सर्वविद्यासाधिका आणि सर्वपोषिका वाणी (नः) आम्हा (सामान्यजनांच्या) (यज्ञम्) संगठनाचे महत्व सांगत आम्हाला प्रेरणा देते) त्या विद्वानांच्या (सह) सहवासात (नः) आम्हालादेखील (वष्टु) कामना करणारे (ज्ञानप्राप्तीचे इच्छुक) करा. (रूद्रैः) मध्यम कोटीच्या विद्वानांनी सांगितलेली वा शिकविलेली (सरस्वती) उत्तम विज्ञानमय वाणी (नः) आम्हास (आवीत्) प्राप्त व्हावी. तसेच (सजोषाः) एकसमान असलेल्या विद्वानांनी स्वीकारलेली (इडा) स्तुतिमयी वाणी जी (वसुभिः) प्रथम कोटीच्या विद्वानांनी सांगितलेली वाणी (यज्ञम्) प्राप्तव्य आनंद देते. (ती आम्हांस धारण करता यावी, असे आम्ही इच्छितो) हे मनुष्यांनो, या (देवीः) दिवतय अशी तीन प्रकारची वाणी आम्हाला (अमृततेषु) अविनाशी जीव आदी नित्य पदार्थांत धारण करोत (या तीन वाणीमुळे आम्हाला आत्मस्वरूपाचे, नित्यत्वाचे ज्ञान व्हावे) हे मनुष्यांनो, तुम्हीही आमच्यासाठी तशीच वाणी धारण करा. ॥8॥
Essence
भावार्थ- मनुष्यासाठी हेच उचित कर्म आहे की त्यांनी उत्तम, मध्यम आणि अधम (सामान्य) अशा विद्वानांकडून ऐकलेली वा अध्ययन केलेली विद्या आणि वाणी, यांचा स्वीकार करावा. मूर्खांकडून काही वाणी शिकूं नये. विद्वानांकडून शिकलेली विद्या व वाणी मानवाला सदा सर्वकाळ सुखदायिनी होते. ॥8॥
Subject
पुनश्‍च, तोच विषयी -