Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 7

60 Mantra
29/7
Devata- अश्विनौ देवते Rishi- बृहदुक्थो वामदेव्य ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
प्र॒थ॒मा वा॑ꣳसर॒थिना॑ सु॒वर्णा॑ दे॒वौ पश्य॑न्ताै॒ भुव॑नानि॒ विश्वा॑।अपि॑प्रयं॒ चोद॑ना वां॒ मिमा॑ना॒ होता॑रा॒ ज्योतिः॑ प्र॒दिशा॑ दि॒शन्ता॑॥७॥

प्र॒थ॒मा। वा॒म्। स॒र॒थिनेति॑ सऽर॒थिना॑। सु॒वर्णेति॑ सु॒ऽवर्णा॑। दे॒वौ। पश्य॑न्तौ। भुव॑नानि। विश्वा॑। अपि॑ऽप्रयम्। चोद॑ना। वा॒म्। मिमा॑ना। होता॑रा। ज्योतिः॑। प्र॒दि॑शेति॑ प्र॒ऽदिशा॑। दि॒शन्ता॑ ॥७ ॥

Mantra without Swara
प्रथमा वाँ सरथिना सुवर्णा देवौ पश्यन्तौ भुवनानि विश्वा । अपिप्रयञ्चोदना वाम्मिमाना होतारा ज्योतिः प्रदिशा दिशन्ता ॥

प्रथमा। वाम्। सरथिनेति सऽरथिना। सुवर्णेति सुऽवर्णा। देवौ। पश्यन्तौ। भुवनानि। विश्वा। अपिऽप्रयम्। चोदना। वाम्। मिमाना। होतारा। ज्योतिः। प्रदिशेति प्रऽदिशा। दिशन्ता॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे दोन विद्याथ्र्यांनो, (प्रथमा) सर्वप्रथम, सर्वप्रधान असे जे (सरथिना) रथासह रथाने जाणारे-येणारे (सुवर्णा) सुंदर गौरवर्णीय दोन विद्वान आहेत, ते (विश्‍वा) समस्त (भुवनानि) निवासाचे लोक जे (ग्रह-नक्षत्रादींना) (पश्यन्तौ) पाहत (सर्व नक्षत्रादीचे ज्ञान मिळवीत) (वाम्) तुम्हा दोघांना (चोदना) प्रेरणा देत (मिमाना) आणि तुमची परीक्षा घेतात, तसेच (ज्योति) सूर्यादीच्या प्रकाशाला (प्रदिशा) आणि दिशांना चांगल्याप्रकारे जाणत (दिशन्ता) तुम्हाला उच्चारणादी) शिकवीत (होतारा) दानशील व (देवौ) तेजस्वी विद्वान करतील, ज्याप्रमाणे ते तुम्हाला विद्वान करतात, त्याप्रमाणे मी (एक विद्वान) त्या दोघांना (अपप्रियम्) तृप्त संतुष्ट वा प्रसन्न करतो. (वाम्) तुम्ही दोघेही माझ्याप्रमाणे त्यांना प्राप्त व्हा (संतुष्ट करा) ॥7॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे विद्यार्थी निष्कपट होऊन विद्वज्जनांचा संग करतात, ते विद्येच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात. जे विद्वान कपट आणि आळस यांचा त्याग करून सर्वांना सत्योपदेश करतील, तर ते विद्वान सुखी आनंदी का बरे होणार नाहीत? ॥7॥
Subject
अध्ययन-अध्यापनात काय असावे, याविषयी -