Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 6

60 Mantra
29/6
Devata- मनुष्या देवताः Rishi- बृहदुक्थो वामदेव्य ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒न्त॒रा मि॒त्रावरु॑णा॒ चर॑न्ती॒ मुखं॑ य॒ज्ञाना॑म॒भि सं॑विदा॒ने।उ॒षासा॑ वासुहिर॒ण्ये सु॑शि॒ल्पेऽऋ॒तस्य॒ योना॑वि॒ह सा॑दयाभि॥६॥

अ॒न्त॒रा। मि॒त्रावरु॑णा। चर॑न्ती॒ऽइति॒ चर॑न्ती॒। मुख॑म्। य॒ज्ञाना॑म्। अ॒भि। सं॒वि॒दा॒ने इति॑ सम्ऽविदा॒ने उ॒षासा॑। उ॒षसेत्यु॒षसा॑। वा॒म्। सु॒हि॒र॒ण्ये इति॑ सुऽहिर॒ण्ये। सु॒शि॒ल्पे इति॑ सुऽशि॒ल्पे। ऋ॒तस्य॑। योनौ॑। इ॒ह। सा॒द॒या॒मि॒ ॥६ ॥

Mantra without Swara
अन्तरा मित्रावरुणा चरन्ती मुखँयज्ञानामभिसँविदाने । उषासा वाँ सुहिरण्ये सुशिल्पेऽऋतस्य योनाविह सादयामि ॥

अन्तरा। मित्रावरुणा। चरन्तीऽइति चरन्ती। मुखम्। यज्ञानाम्। अभि। संविदाने इति सम्ऽविदाने उषासा। उषसेत्युषसा। वाम्। सुहिरण्ये इति सुऽहिरण्ये। सुशिल्पे इति सुऽशिल्पे। ऋतस्य। योनौ। इह। सादयामि॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - शिल्पविद्येचे (तंत्रविद्या व अभियांत्रिकी अधिकारी किंवा सुतारकाम, चित्रकारी आदी कलांचे कलाकार) प्रचारक हे दोन विद्वान, ज्याप्रमाणे मी (एक गृहस्थ नागरिक) (अन्तरा) शरीराच्या आत (मित्रावरूणा) प्राण आणि उदान वायूला (चरन्ती) सर्वत्र संचारित करतो आणि (यज्ञानाम्) संगतीयोग्य संग्रहणीय पदार्थांच्या (मुखम्) मुख्य भागाला (अभि, संविदाने) सर्वत सम्यक ज्ञानप्राप्तीसाठी (एकत्रित करतो) तसे (सुहिरण्ये) सुंदर तेजस्वी आणि (सुशिल्पे) सुंदर कारीगरी केलेल्या वस्तू (उषासाः) प्रात:काळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळांत (गृहतस्य) सत्याने (योनौ) वागणार्‍या या घरात (सादयामि) स्थापित करतो. माझ्याप्रमाणे हे शिल्पविद्याकुशल महोदय, आपण माझ्यासाठी वरीलप्रमाणे कार्य वा संग्रह करा ॥6॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे सकाळ संध्याकाळ या दोन वेळा शुद्ध स्थानात जाऊन बसणार्‍या मनुष्यासाठी प्राण व उदान वायूप्रमाणे सुखकारिणी होतात, त्याप्रमाणे शुद्ध स्वच्छ प्रदेशात मोठी दारें असलेले घर गृहजनांना सर्वप्रकारे सुखी करतात ॥6॥
Subject
पुन्हा, तोच विषय -