Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 58

60 Mantra
29/58
Devata- विद्वांसो देवता Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- भुरिगत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ॒ग्ने॒यः कृ॒ष्णग्री॑वः सारस्व॒ती मे॒षी ब॒भ्रुः सौ॒म्यः पौ॒ष्णः श्या॒मः शि॑तिपृ॒ष्ठो बा॑र्हस्प॒त्यः शि॒ल्पो वै॑श्वदे॒वऽऐ॒न्द्रोऽरु॒णो मा॑रु॒तः क॒ल्माष॑ऽऐन्द्रा॒ग्नः स॑ꣳहि॒तोऽधोरा॑मः सावि॒त्रो वा॑रु॒णः कृ॒ष्णऽएक॑शितिपा॒त्पेत्वः॑॥५८॥

आ॒ग्ने॒यः। कृ॒ष्णग्री॑व॒ इति॑ कृ॒ष्णऽग्री॑वः। सा॒र॒स्व॒ती। मे॒षी। ब॒भ्रुः। सौ॒म्यः। पौ॒ष्णः। श्या॒मः। शि॒ति॒पृ॒ष्ठ इति॑ शितिऽपृ॒ष्ठः ॥ बा॒र्ह॒स्प॒त्यः। शि॒ल्पः। वै॒श्व॒दे॒व इति॑ वैश्वऽदे॒वः। ऐ॒न्द्रः। अ॒रु॒णः। मा॒रु॒तः। क॒ल्माषः॑। ऐ॒न्द्रा॒ग्नः। स॒ꣳहि॒त इति॑ सम्ऽहि॒तः। अ॒धोरा॑म॒ इत्य॒धःऽरा॑मः। सा॒वि॒त्रः। वा॒रु॒णः। कृ॒ष्णः। एक॑शितिपा॒दित्येक॑ऽशितिपात्। पेत्वः॑ ॥५८ ॥

Mantra without Swara
आग्नेयः कृष्णग्रीवः सारस्वती मेषी बभ्रुः सौम्यः पौष्णः श्यामः शितिपृष्ठो बार्हत्यः शिल्पो वैश्वदेवऽऐन्द्रोरुणो मारुतः कल्माषऽऐन्द्राग्नः सँहितोधोरामः सावित्रो वारुणः कृष्णऽएकशितिपात्पेत्वः ॥

आग्नेयः। कृष्णग्रीव इति कृष्णऽग्रीवः। सारस्वती। मेषी। बभ्रुः। सौम्यः। पौष्णः। श्यामः। शितिपृष्ठ इति शितिऽपृष्ठः॥ बार्हस्पत्यः। शिल्पः। वैश्वदेव इति वैश्वऽदेवः। ऐन्द्रः। अरुणः। मारुतः। कल्माषः। ऐन्द्राग्नः। सꣳहित इति सम्ऽहितः। अधोराम इत्यधःऽरामः। सावित्रः। वारुणः। कृष्णः। एकशितिपादित्येकऽशितिपात्। पेत्वः॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (तुम्ही मंत्रात उल्लेखित पशू-पक्ष्यांचे गुण मंत्रात सांगितल्याप्रमाणे जाणून घ्या)(आग्नेयः) अग्निदेवतामय म्हणजे अग्नीच्या उत्तम गुणांनी युक्त तो पशू जाणावा की जो (कृष्णग्रीवः) काळ्या गळ्याचा आहे. (सारस्वती) सरस्वती वाणीच्या गुणांनी युक्त ती (मेषी) मेंढी आणि (सौम्यः) चंद्राच्या गुणांचा पशू (बभ्रूः) धुराच्या रंगाचा असेल, तो जाणावा. (श्यामः) श्याम रंगाचा पशू (पौष्णः) पुष्टिकारक गुणांचा आणि (शितिपृष्ठः) काळी पाठ असलेला पशू (बार्हस्पत्यः) विशाल आकाशाच्या पालन गुण धारण करणारा जाणावा. (शिल्पः) अनेक वर्ण रंग असलेला पशू (वैश्‍वदेवः) सर्व विद्वानांचे गुण असलेला आणि (अरूणः) लाल रंगाचा पशू (ऐन्द्रः) सूर्याच्या गुणांचा जाणावा. (कल्माषः) खाकी रंगाचा पशू (मारूतः) वायूच्या गुणांचा आणि (संहितः) मोठ्या दृढ अवयवांचा पशू (रेडा, गेंडा आदी) (ऐन्द्राग्नः) सूर्य आणि अग्नीचा गुणांचा जाणावा. (अधोरामः) खाली उडणारा (जमीनीच्या जवळ उडणारा) पक्षी (सावित्रः) सूर्याच्या गुणांचा आणि (पेत्वः) वर उडणारा पक्षी (एकशितिपात्) एक पाय काळा असलेला पक्षी असतो, हे जाणा. तसेच (कृष्णः) काळ्या रंगाचा पक्षी (वकणः) जलाचे शान्ति आदी गुण धारण करणारा असतो याप्रमाणे सर्व जाणा. ॥58॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्या ज्या देवताच्या गुणांचे जे जे पशू वा पक्षी सांगितले आहेत. ते ते त्या त्या गुणांचे आहेत, असे जाणा. याविषयीच मंत्रात उपदेश केला आहे. ॥58॥
Subject
आता पुढील मंत्रात पशूचे गुण कसे असावेत वा असतात, या विषयी -