Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 54

60 Mantra
29/54
Devata- वीरो देवता Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ म॒रुता॒मनी॑कं मि॒त्रस्य॒ गर्भो॒ वरु॑णस्य॒ नाभिः॑।सेमां नो॑ ह॒व्यदा॑तिं जुषा॒णो देव॑ रथ॒ प्रति॑ ह॒व्या गृ॑भाय॥५४॥

इन्द्रस्य। वज्रः॑। म॒रुता॑म्। अनी॑कम्। मि॒त्रस्य॑। गर्भः॑। वरु॑णस्य। नाभिः॑। सः। इ॒माम्। नः॒। ह॒व्यदा॑ति॒मिति॑ ह॒व्यऽदा॑तिम्। जु॒षा॒णः। देव॑। र॒थ॒। प्रति॑। ह॒व्या। गृ॒भा॒य॒ ॥५४ ॥

Mantra without Swara
इन्द्रस्य वज्रो मरुतामनीकम्मित्रस्य गर्भो वरुणस्य नाभिः । सेमान्नो हव्यदातिञ्जुषाणो देव रथ प्रति हव्या गृभाय ॥

इन्द्रस्य। वज्रः। मरुताम्। अनीकम्। मित्रस्य। गर्भः। वरुणास्य। नाभिः। सः। इमाम्। नः। हव्यदातिमिति हव्यऽदातिम्। जुषाणः। देव। रथ। प्रति। हव्या। गृभाय॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देव) उत्तम विद्यावान आणि (रथ) रमणीय रूप असलेले विद्वान, आपण (इमाम्) या (हव्यदातिम्) दातव्य पदार्थाचे (आम्ही देत असलेले दान वा आमची भेट)(जुषाणः) सेवन वा स्वीकार करा. (सः) ते आपण (इनद्रस्य) विजेचा (वज्रः) प्रहार (आकाशातील वीज पडणे यासारखा अतिभयंकर प्रसंगाला आनंदाने सामोरे जा. आपण (मरूताम्) मनुष्यांची (अनीकम्) सेना आणि (मित्रस्य) मित्राच्या (गर्भः) मनातील (कुठिल वा उत्तम दोन्ही प्रकारच्या) विचार जाणणारे असे ??? विद्वान आहात. तसेच (वरुणस्य) श्रेष्ठ जनाच्या (नाभिः) आत्माच्या मध्यवर्ती विचार (ओळखणारे आहात) म्हणून (नः) आम्हाला आणि (हव्या) ग्रहणीय पदार्थांचे (प्रति, गृभाय) प्रतिग्रह करा. वस्तूंचा स्वीकार करा (आम्हास अभय द्या व आमची भेट स्वीकारा) ॥54॥
Essence
भावार्थ - ज्या लोकांची वा ज्या राष्ट्राची सेना अतिश्रेष्ठ असते, जे विद्युतशास्त्र जाणतात आणि मित्राचे मनोगत ओळखतात आप्त सत्यवादी जनांचे विचार ऐकतात, तसेच विद्यादान करतात आणि दान स्वीकारतात, त्यांचे कल्याण होते. ॥54॥
Subject
पुन्हा, त्या विषयी -