Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 49

60 Mantra
29/49
Devata- वीरा देवताः Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ऋजी॑ते॒ परि॑ वृङ्धि॒ नोऽश्मा॑ भवतु नस्त॒नूः।सोमो॒ऽअधि॑ ब्रवीतु॒ नोऽदि॑तिः॒ शर्म॑ यच्छतु॥४९॥

ऋजी॑ते। परि॑। वृ॒ङ्धि॒। नः॒। अश्मा॑। भ॒व॒तु॒। नः॒। त॒नू। सोमः॑। अधि॑। ब्र॒वी॒तु॒। नः॒। अदि॑तिः। शर्म॑। य॒च्छ॒तु॒ ॥४९ ॥

Mantra without Swara
ऋजीते परिवृङ्धि नोश्मा भवतु नस्तनूः । सोमोऽअधि ब्रवीतु नो दितिः शर्म यच्छतु ॥

ऋजीते। परि। वृङ्धि। नः। अश्मा। भवतु। नः। तनू। सोमः। अधि। ब्रवीतु। नः। अदितिः। शर्म। यच्छतु॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, आपण (ऋजीते) सरल व सदाचरण कार्यासाठी (नः) आमच्या शरीरापासून सर्व रोग (परि, वृङ्धि) सर्वतः दूर करा की ज्यामुळे (नः) आमचे (तनूः) शरीर (अश्मा) दगडाप्रमाणे दृढ (भवतु) व्हावे. तसेच जी (सोमः) उत्तम औषधी आहे, तिच्याविषयी आणि (अदितिः) पृथ्वी विषयी आपण आम्हाला (अधि, ब्रवीतु) उपदेश द्या आणि (नः) आमचे (शर्म) घर सुखमय (यच्छतु) असावे, असे करा. ॥49॥
Essence
भावार्थ - जे लोक ब्रह्मचर्य, औषध, पथ्य, आणि स्वास्थरक्षक सुंदर नियमांचे पालन करून शरीररक्षा व पोषण करतात, त्यांचे शरीर दृढ होते. ज्याप्रमाणे पृथ्वीचा दगड, विटा आदी पदार्थांनी बनलेले शरीर हे एक घर आहे, त्याप्रमाणे शरीर हे आत्म्याचे घर आहे. ॥49॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी -