Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 47

60 Mantra
29/47
Devata- धनुर्वेदाऽध्यापका देवताः Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- विराट् जगती Swara- निषादः
Mantra with Swara
ब्राह्म॑णासः॒ पित॑रः॒। सोम्या॑सः शि॒वे नो॒ द्यावा॑पृथि॒वीऽअ॑ने॒हसा॑।पू॒षा नः॑ पातु दुरि॒तादृ॑तावृधो॒ रक्षा॒ माकि॑र्नोऽअ॒घश॑ꣳसऽईशत॥४७॥

ब्रा॒ह्म॑णासः। पित॑रः। सोम्यासः॑। शि॒वेऽइति॑ शि॒वे। नः॒। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। अ॒ने॒हसा॑। पू॒षा। नः॒। पा॒तु॒। दु॒रि॒तादिति॑ दुःऽइ॒तात् ऋ॒ता॒वृ॒धः॒। ऋ॒त॒वृध॒ इत्यृ॑तऽवृधः। रक्ष॑। माकिः॑। न॒। अ॒घश॑ꣳस॒ इत्य॒घऽश॑ꣳसः। ई॒श॒त॒ ॥४७ ॥

Mantra without Swara
ब्राह्मणासः पितरः सोम्यासः शिवे नो द्यावापृथिवीऽअनेहसा । पूषा नः पातु दुरितादृतावृधो रक्षा माकिर्ना अघशँस ईशत ॥

ब्राह्मणासः। पितरः। सोम्यासः। शिवेऽइति शिवे। नः। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। अनेहसा। पूषा। नः। पातु। दुरितादिति दुःऽइतात् ऋतावृधः। ऋतवृध इत्यृतऽवृधः। रक्ष। माकिः। न। अघशꣳस इत्यघऽशꣳसः। ईशत॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (सोम्यासः) उत्तम आनंददायक गुणांचे निधी आणि (ऋतावृधः) सत्याची वृद्धी करणारे, (पितर) सर्वांचे रक्षक असे जे (ब्राह्मणासः) वेद आणि ईश्‍वर यांचे ज्ञानी विद्वान आहेत, ते (नः) आमचे कल्याण करणारे असावेत. तसेच (अनेहसा) कारणरूपेण जे अविनाशी, ते (द्यावापृथिवी) प्रकाशलोक आणि पृथ्वी (शिवे) आमच्याकरिता कल्याणकारी होवोत. (पूवा) सर्वांचा पोषक परमात्मा (नः) आमचे (दुरितात्) दुष्ट व अन्याययुक्त आचरणापासून (पातु) रक्षण करो. त्याच्या रक्षणामुळे (सामान्यजनांना) मारण्यास सज्ज अशा कोणीही (अघशंस) पापी वा चोर (नः) आम्हाला (माकिः) (ईशत) मारण्यात वा त्रास देण्यात समर्थ होऊ नये. हे परमेश्‍वर, तू त्या विद्वानांची रक्षा कर व चोरांना दंडित कर. ॥47॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जे विद्वज्जन तुम्हांला धर्ममय कार्यास प्रवृत्त करतात, दुष्टाचरणापासून दूर ठेवतात, दुराचारी जनांची शक्ती क्षीण वा नष्ट करून आम्हांस पुष्ट व शक्तीमान करतात, ते अवश्य सत्कारास पात्र आहेत. (तुम्ही त्यांचा सत्कार करीत जा) ॥47॥
Subject
कोणाचा सत्कार करावा, याविषयी -