Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 46

60 Mantra
29/46
Devata- वीरा देवताः Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स्वा॒दु॒ष॒ꣳ सदः॑ पि॒तरो॑ वयो॒धाः कृ॑च्छ्रे॒श्रितः॒ शक्तीं॑वन्तो गभी॒राः।चि॒त्रसे॑ना॒ऽइषु॑बला॒ऽअमृ॑ध्राः स॒तोवी॑राऽउ॒रवो॑ व्रातसा॒हाः॥४६॥

स्वा॒दु॒ष॒ꣳसदः॑। स्वा॒दु॒स॒ꣳसद इति॑ स्वादुऽस॒ꣳसदः॑। पि॒तरः॑। व॒यो॒धा इति॑ वयः॒ऽधाः। कृ॒च्छ्रे॒श्रित॒ इति॑ कृच्छ्रे॒ऽश्रितः॑। शक्ती॑वन्तः॒। शक्ति॑वन्त॒ इति॒ शक्ति॑ऽवन्तः। ग॒भी॒राः। चि॒त्रसे॑ना॒ इति॑ चि॒त्रऽसे॑नाः। इषु॑बला॒ इतीषु॑ऽबलाः। अमृ॑ध्राः। स॒तोवी॑रा॒ इति॑ स॒तःऽवी॑राः। उ॒रवः॑। व्रा॒त॒सा॒हाः। व्रा॒त॒स॒हा इति॑ व्रातऽस॒हाः ॥४६ ॥

Mantra without Swara
स्वादुषँसदः पितरो वयोधाः कृच्छ्रेश्रितः शक्तीवन्तो गभीराः । चित्रसेनाऽइषुबलाऽअमृध्राः सतोवीराऽउरवो व्रातसाहाः ॥

स्वादुषꣳसदः। स्वादुसꣳसद इति स्वादुऽसꣳसदः। पितरः। वयोधा इति वयःऽधाः। कृच्छ्रेश्रित इति कृच्छ्रेऽश्रितः। शक्तीवन्तः। शक्तिवन्त इति शक्तिऽवन्तः। गभीराः। चित्रसेना इति चित्रऽसेनाः। इषुबला इतीषुऽबलाः। अमृध्राः। सतोवीरा इति सतःऽवीराः। उरवः। व्रातसाहाः। व्रातसहा इति व्रातऽसहाः॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे युद्ध करणारे वीर सैनिकहो, (जे महापराक्रमी सैनिक आहेत, त्यांचा तुम्ही अनुकरण करा. ते कसे आहेत? (स्वादुषंसदः) उत्तम अन्न आदी पदार्थांचे सेवन करणारे आणि (वयोधाः) तुमच्यापेक्षा अधिक वयाचे आणि अनुभवी आहेत. (कृच्छ्रेश्रितः) उत्तम कार्यासाठी ते कितीही कष्ट उपसतात, (शक्तीवन्तः) ते सामर्थ्यवान असून (गभीराः) उदारचेता आहेत. (चित्रसेनाः) त्यांच्या जवळ अद्भुत गुणांचा संग्रह असून (इषुबलाः) त्यांची सेना शस्त्र-अस्त्रांनी सुसज्ज आहे. ते (अमृध्राः) दृढ व बलदंड शरीराचे आहेत (उरवः) त्यांची छाती आणि जंघा विशाल असून ते (व्रातसाहाः ) शत्रूच्या आक्रमणाला झेलू शकणारे आहेत. (सतोवीराः) ते विद्यमान सैन्यात सर्वाधिक अनुभवी व प्रशिक्षित आहेत. असे (पितरः) युद्धा प्रसंगी तुमचे रक्षण करणार्‍या राजा वा राजपुरुषांचा तुम्ही आश्रय घ्या. ॥46॥
Essence
भावार्थ - ते लोकच सदा विजयी होतात, त्यांचीच श्री, प्रतिष्ठा वाढते, ज्यांच्याजवळ अनुभवी सैन्य आणि आवश्यक युद्ध तंत्रज्ञान असते. तसेच जे लोक (वा सैनिक) आपल्या अधिकार्‍यांच्या आदेशाप्रमाणे, आप्त सत्यवादी लोकांच्या मताप्रमाणे चालतात, तेच विजयी होतात आणि त्यांचेच राज्य वाढते. ॥46॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -