Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 43

60 Mantra
29/43
Devata- वीरा देवताः Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
रथे॒ तिष्ठ॑न्नयति वा॒जिनः॑ पु॒रो यत्र॑यत्र का॒मय॑ते सुषार॒थिः। अ॒भीशू॑नां महि॒मानं॑ पनायत॒ मनः॑ प॒श्चादनु॑ यच्छन्ति र॒श्मयः॑॥४३॥

रथे॑। तिष्ठ॑न्। न॒य॒ति॒। वा॒जिनः॑। पु॒रः। यत्र॑य॒त्रेति॒ यत्र॑ऽयत्र। का॒मय॑ते। सु॒षा॒र॒थिः। सु॒सा॒र॒थिरिति॑ सुऽसार॒थिः। अ॒भीशू॑नाम्। म॒हि॒मान॑म्। प॒ना॒य॒त॒। मनः॑। प॑श्चात्। अनु॑। य॒च्छ॒न्ति॒। र॒श्मयः॑ ॥४३ ॥

Mantra without Swara
रथे तिष्ठन्नयति वाजिनः पुरो यत्रयत्र कामयते सुषारथिः । अभीशूनाम्महिमानम्पनायत मनः पश्चादनु यच्छन्ति रश्मयः ॥

रथे। तिष्ठन्। नयति। वाजिनः। पुरः। यत्रयत्रेति यत्रऽयत्र। कामयते। सुषारथिः। सुसारथिरिति सुऽसारथिः। अभीशूनाम्। महिमानम्। पनायत। मनः। पश्चात्। अनु। यच्छन्ति। रश्मयः॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, एक (सुषारथिः) कुशल सारथी घोड्यांना वा अग्नी आदीच्या शक्तीने चालणार्‍या वाहनांचा कुशल चालक (रथे) रमण करण्यास योग्य स्थळ म्हणजे पृथ्वी, जल अथवा आकाशात चालणार्‍या यानात (तिष्ठन्) बसून (यत्र यत्र) ज्या ज्या युद्धात वा प्रदेशात (कामयते जाण्याची इच्छा करतो, तिथे तिथे (वाजिनः) अश्‍वांना अथवा वेगवान आग्नेय वाहनांना (पुरः) पुढे (नयति) घेऊन जातो. ज्या अश्‍वांचे (मनः) मन उत्तमप्रकारे प्रशिक्षित आहे तसेच ज्यांचा (रश्मयः) लगाम अथवा (संचालनयंत्रें) चालकाच्या पूर्ण नियंत्रणात आहेत) असे चालक रथाच्या वाहनाच्या (पश्‍चात्) मागील भागात बसून (अनु, गच्छन्ति) जातात व त्या वाहनाला नियंत्रित करतात त्या (अभीशुनाम्) सर्व दिशांना शीघ्र जाणार्‍या रथाचे आणि यानाचे (महिमानम्) महत्व तुम्ही (वायुसैनिकांनी) (पनायत) जाणून घ्यावे आणि त्यांची प्रशंसा करावी. ॥43॥
Essence
भावार्थ - जे राजा राजपुरुष चक्रवर्ती राज्यादी आणि स्थायी विजयाची कामना करीत असतील, तर त्यांनी उत्तम सुशिक्षित मंत्री, प्रशिक्षित अश्‍व आदी तसेच अन्य युद्धात आवश्यक अस्त्र-शस्त्र आदी तयार ठेवावेत. या शिवाय त्यांनी आपले शारिरीक व आत्मिक बळ जागृत ठेवावे. ॥43॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -