Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 42

60 Mantra
29/42
Devata- वीरा देवताः Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
ब॒ह्वी॒नां पि॒ता ब॒हुर॑स्य पु॒त्रश्चि॒श्चा कृ॑णेति॒ सम॑नाव॒गत्य॑। इ॒षु॒धिः संङ्काः॒ पृत॑नाश्च॒ सर्वाः॑ पृ॒ष्ठे निन॑द्धो जयति॒ प्रसू॑तः॥४२॥

ब॒ह्वी॒नाम्। पि॒ता। ब॒हुः। अ॒स्य॒। पु॒त्रः। चि॒श्चा। कृ॒णो॒ति॒। सम॑ना। अ॒व॒गत्येत्य॑व॒ऽगत्य॑। इ॒षु॒धिरिती॑षु॒ऽधिः। सङ्काः॑। पृत॑नाः। च॒। सर्वाः॑। पृ॒ष्ठे। निन॑द्ध॒ इति॒ निऽन॑द्धः। ज॒य॒ति॒। प्रसू॑त इति॒ प्रऽसू॑तः ॥४२ ॥

Mantra without Swara
बह्वीनाम्पिता बहुरस्य पुत्रश्चिश्चाकृणोति समनावगत्य । इषुधिः सङ्काः पृतनाश्च सर्वाः पृष्ठे निनद्धो जयति प्रसूतः ॥

बह्वीनाम्। पिता। बहुः। अस्य। पुत्रः। चिश्चा। कृणोति। समना। अवगत्येत्यवऽगत्य। इषुधिरितीषुऽधिः। सङ्काः। पृतनाः। च। सर्वाः। पृष्ठे। निनद्ध इति निऽनद्धः। जयति। प्रसूत इति प्रऽसूतः॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे वीर पुरुषहो, (पिता) पिता जसा (पुत्रः) पुत्राला, तसा (बह्णीनाम्) अनेक प्रत्यंयाचा पिता म्हणजे धारणकर्ता सैनिक ज्या धनुष्यास धारण करतो (अस्य) या पित्याच्या म्हणजे धनुर्धर सैनिकाच्या (पृष्ठे) मागील भागात म्हणजे पाठीवर (निनद्धः) बांधलेला (इषुधिः) बाणांचा भाता असतो. या दोन्हीने सन्नध युद्ध (प्रसूतः) तत्पर झालेला (समनाः) युद्धक्षेत्रात (अवगत्य) जाऊन त्या सैनिकाचे धनुष्य (चिंश्‍चा) चिं चिं चिं असा शब्द, (कृणोति) करते. (नवीन पादत्राण, धनुष्य, दोरी सर्व पदार्थ काहीतरी शब्द करतात, तसे धनुष्याची दोरी चिं चिं वा करकर ध्वनि करते) या अशा धनुष्याने वीर सैनिक सर्व (संकाः) एकत्रित वा विखुरलेल्या (पृतनाः) शत्रुसैन्याला (जयति) जिंकतो. हे वीर पुरुषहो, अशा धनुष्याची रक्षा करा (आपले अस्त्र-शस्त्र नेहमी जपून सांभाळून ठेवा.) ॥42॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोमा अलंकार आहे. जसा अनेक पुत्रींचा आणि अनेक पुत्रांचा पिता त्याची सर्व संताने अपत्य शब्दाने संबोधिली जातात, तसेच धनुष, प्रत्यंचा, बाण हे सर्व मिळून अनेक प्रकारचा ध्वनी उत्पन्न करतात. ज्या सैनिकाच्या पाठीच्या डाव्या भागावर धनुष्य असेल, तो उजव्या हातानें बाण काढून धनुष्याच्या प्रत्यंचेवर चढवणार. अशाप्रकारे अभ्यासवशात् बाण सोडण्यात शीघ्रता येते. असा वीर विजयी होतो. ॥42॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -