Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 20

60 Mantra
29/20
Devata- अग्निर्देवता Rishi- भार्गवो जमदग्निर्ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
हिर॑ण्यशृ॒ङ्गोऽयो॑ऽअस्य॒ पादा॒ मनो॑जवा॒ऽअव॑र॒ऽइन्द्र॑ऽआसीत्।दे॒वाऽइद॑स्य हवि॒रद्यमाय॒न्योऽअर्व॑न्तं प्रथ॒मोऽअ॒ध्यति॑ष्ठत्॥२०॥

हिर॑ण्यशृङ्ग॒ इति॒ हिर॑ण्यऽशृङ्गः। अयः॑। अ॒स्य॒। पादाः॑। मनो॑जवा॒ इति॒ मनः॑ऽजवाः। अव॑रः। इन्द्रः॑। आ॒सी॒त्। दे॒वाः। इत्। अ॒स्य॒। ह॒वि॒रद्य॒मिति॑ हविः॒ऽअद्य॑म्। आ॒य॒न्। यः। अर्व॑न्तम्। प्र॒थ॒मः। अ॒ध्यति॑ष्ठदित्यधि॒ऽअति॑ष्ठत् ॥२० ॥

Mantra without Swara
हिरण्यशृङ्गो योऽअस्य पादा मनोजवाऽअवर इन्द्रऽआसीत् । देवाऽइदस्य हविरद्यमायन्योऽअर्वन्तम्प्रथमो अध्यतिष्ठत् ॥

हिरण्यशृङ्ग इति हिरण्यऽशृङ्गः। अयः। अस्य। पादाः। मनोजवा इति मनःऽजवाः। अवरः। इन्द्रः। आसीत्। देवाः। इत्। अस्य। हविरद्यमिति हविःऽअद्यम्। आयन्। यः। अर्वन्तम्। प्रथमः। अध्यतिष्ठदित्यधिऽअतिष्ठत्॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यः) जो (अवरः) नवीन (हिरण्यशृहगः) (हरणाच्या) वा स्वर्णमयचमक असलेल्या शिंगा प्रमाणे ज्याचे तेज आहे, असा उत्तम ऐश्‍वर्यवान विद्युतेप्रमाणे असलेला राष्ट्राचा तेजस्वी सभापती (आसीत्) असावा. (अर्वन्तम्) तो सभापती घोड्याप्रमाणे मार्गावर (प्रथमः) प्रथम येणारा अग्नी आहे. त्याचा तसेच (अयः) सुवर्णाचा (अध्यतिष्ठत्) अधिष्ठाता आहे अर्थात अग्नीद्वारा संचालित यानात बसून जाणारा राजा आहे. (अस्य) या राजाचे (पादाः) दोन्ही पाय (मनोजयाः) मनाच्या वेगाप्रमाणे असावेत म्हणजे विमान हेच त्याचे पाय असावेत. त्यात बसून त्याने मार्गक्रमण त्वरित करावे. (देवाः) विद्यावान राजसभासदगण (अस्य) या राजासाठी (हविरद्यम्) त्याच्या सैन्यासाठी सामग्री) सेणारे व त्याच्याकडून भोजनादी पदार्थ (इत् आयन्) प्राप्त करणारे असोत (विद्वानांनी राजाला मंत्राणा, आवश्यक सामग्री, तांत्रिक ज्ञान द्यावे आणि राजाने त्यांना भोजनादीद्वारे संतुष्ट करावे, हा आशय आहे) हे मनुष्यांनो, तुम्हीही त्या राजाला व विद्वानांना जाणून घ्या (त्याला सहकार्य द्या) ॥20॥
Essence
भावार्थ - जे लोक अग्नि आदी पदार्थांचे गुण, कर्म, स्वभाव यांना यथावत जाणतात, ते अद्भुत कार्य सिद्ध करू शकतात. जे नागरिक मोठ्या आत्मीयतेने राजकार्य पूर्ण करतात, ते सत्कार-सम्मानास प्राप्त आहेत (वा राजाने त्यांचा सत्कार करावा) आणि जे राजकार्यात विघ्न-बाधा आणतील, त्यांना राजाने अवश्य दंडित करावे. ॥20॥
Subject
मनुष्यांनी अग्नी आदी पदार्थांच्या गुणांचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर कोणते कार्य पूर्ण करून घेतले पाहिजेत, याविषयी -