Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 19

60 Mantra
29/19
Devata- मनुष्यो देवता Rishi- भार्गवो जमदग्निर्ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अनु॑ त्वा॒ रथो॒ऽअनु॒ मर्यो॑ऽअर्व॒न्ननु॒ गावोऽनु॒ भगः॑ क॒नीना॑म्।अनु॒ व्राता॑स॒स्तव॑ स॒ख्यमी॑यु॒रनु॑ दे॒वा म॑मिरे वी॒र्यं ते॥१९॥

अनु॑। त्वा॒। रथः॑। अनु॑। मर्यः॑। अ॒र्व॒न्। अनु॑। गावः॑। अनु॑। भगः॑। क॒नीना॑म्। अनु॑। व्राता॑सः। तव॑। स॒ख्यम्। ई॒युः॒। अनु॑। दे॒वाः। म॒मि॒रे॒। वी॒र्य᳖म्। ते॒ ॥१९ ॥

Mantra without Swara
अनु त्वा रथोऽअनु मर्याऽअर्वन्ननु गावोनु भगः कनीनाम् । अनु व्रातासस्तव सख्यमीयुरनु देवा ममिरे वीर्यन्ते ॥

अनु। त्वा। रथः। अनु। मर्यः। अर्वन्। अनु। गावः। अनु। भगः। कनीनाम्। अनु। व्रातासः। तव। सख्यम्। ईयुः। अनु। देवाः। ममिरे। वीर्यम्। ते॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अर्वन्) अश्‍वाप्रमाणे (विद्येच्या क्षेत्रात गतिमान असलेले हे विदवन, (ते) आपल्या (कनीनाम्) (अधीनस्य उपअधिकार्‍यांसह) उत्तम अधिकारी आणि जे (देवाः) विद्वज्जन आणि इतर मनुष्य (राजसभेमधे) आपापल्या (अनु, वीर्यम्) बळ आणि केलेल्या पराक्रमाच्या आधारे (अनु, ममिरे) आपल्याशी अनुकूलतेने वागो. (तुमचा अधिकारी कर्मचारीवर्ग तुमच्या आदेशाप्रमाणे कार्य करो) ते सर्व (तव) तुमच्या (सख्यम्) मित्रत्वाची (अनु, ईयुः) इच्छुक असावेत. (रथः) सैन्यातील रथ वा सारथी (त्वा) (अनु) आपणांसाठी अनुकूल असावेत (त्वा) आपल्याशी (अनु) अनुकूल सर्व आश्रित असावेत (मर्यः) सर्व साधारण मनुष्य, नागरिक (त्वा) आपणाला (अनु) अनुकूल वा आपले अनुगमन करणारे तसेच (गावः) गायी (गोधन) (त्वा) आपल्याला (अनु) अनुकूल राहो. तसेच (भगः) राज्याचे सर्व ऐश्‍वर्य आपल्या अनुकूल असावे (ते राज्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध असावे) ॥19॥
Essence
भावार्थ - जर माणसें स्वतः सुशिक्षित, प्रशिक्षित होऊन इतरांनाही तसे करतील, तर त्या सुशिक्षित जनांपैकी काहींना सभासद करावे. तय राज्यसभेपैकी अत्युत्तम व्यक्तीला सभापती करावे. तो सभापती राज्यसभा आणि प्रजाजनांपैकी प्रधान काही लोक निवडून राजकार्य चालवतील, आणि एकमेकाशी अनुकूलतेने वागतील, तर राज्याची सर्व कामें पूर्ण होतील. ॥19॥
Subject
मनुष्यांनी राजा आणि प्रजेची कार्ये कशी पूर्ण करावीत, या विषयी -