Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 17

60 Mantra
29/17
Devata- अग्निर्देवता Rishi- भार्गवो जमदग्निर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ॒त्मानं॑ ते॒ मन॑सा॒राद॑जानाम॒वो दि॒वा प॒तय॑न्तं पत॒ङ्गम्।शिरो॑ऽअपश्यं॒ प॒थिभिः॑ सु॒गेभि॑ररे॒णुभि॒र्जेह॑मानं पत॒त्त्रि॥१७॥

आ॒त्मान॑म्। ते॒। मन॑सा। आ॒रात्। अ॒जा॒ना॒म्। अ॒वः। दि॒वा। प॒तय॑न्तम्। प॒त॒ङ्गम्। शिरः॑। अ॒प॒श्य॒म्। प॒थिभि॒रिति॑ प॒थिऽभिः॑। सु॒गेभि॒रिति॑ सु॒ऽगेभिः॑। अ॒रे॒णुभि॒रित्य॑रे॒णुऽभिः॑। जेह॑मानम्। प॒त॒त्रि ॥१७ ॥

Mantra without Swara
आत्मानन्ते मनसारादजानामवो दिवा पतयन्तम्पतङ्गम् । शिरोऽअपश्यम्पथिभिः सुगेभिररेणुभिर्जेहमानम्पतत्रि ॥

आत्मानम्। ते। मनसा। आरात्। अजानाम्। अवः। दिवा। पतयन्तम्। पतङ्गम्। शिरः। अपश्यम्। पथिभिरिति पथिऽभिः। सुगेभिरिति सुऽगेभिः। अरेणुभिरित्यरेणुऽभिः। जेहमानम्। पतत्रि॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, मी (एक विद्वान) (अरसा) स्वतःच्या चिंतन-मननाद्वारे (आसत्) आपल्या जवळच कधी (अवः) खाली, तर कधी (दिवा) आकाशात (पतङ्गम्) सूर्याकडे (पतयन्तम्) जाताना अशा (ते) आपल्या (आत्मानम्) आत्मस्वरूपाला (अजानाम्) जाणतो वा अनुभव करतो. (मी आत्म्याच्या माध्यमातून दूरच्या प्रदेशात प्रवास करून येतो) तसेच (अरेणुभिः) ज्या मार्गावर अजिबात धूळ, धूर नाही अशा निर्मळ आणि (सुगेभिः) सुगम सुखेन गम्य अशा (पथिभिः) (आकाशीच व अवकाशातील) मार्गाने (जेडमानम्) प्रयन्तपूर्वक (यान चालवीत) (पतत्रि) पक्ष्याप्रमाणे उडणार्‍या (शिरः) ज्याचे डोके (समोरील भाग) दुरून डोक्याप्रमाणे गोल दिसते, तशा विमान आदी यानांना (अपश्‍वम्) पाहतो, तसे हे विद्वान, आपणही पहा. ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखावी जो सर्वापेक्षा अतिवेगवान असून अग्नीवत तेजाची आहे. तसेच योग्य वैज्ञानिक वा तांत्रिक पद्धतीने निर्मित अशा अग्नीसंचालित यानांमधे बसून जल, स्थल व आकाशात प्रयत्नपूर्वक विहार करा, दूरवर जा. जसे शरीरात शिरा उत्तम आहे, तसे (यानात) विमानाला उत्तम जाणावे. ॥17॥
Subject
यानांचे निर्माण करून काय करावे, (कोणते लाभ घ्यावेत) या विषयी -