Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 16

60 Mantra
29/16
Devata- अग्निर्देवता Rishi- भार्गवो जमदग्निर्ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒मा ते॑ वाजिन्नव॒मार्ज॑नानी॒मा श॒फाना॑ सनि॒तुर्नि॒धाना॑।अत्रा॑ ते भ॒द्रा र॑श॒नाऽअ॑पश्यमृ॒तस्य॒ याऽअ॑भि॒रक्ष॑न्ति गो॒पाः॥१६॥

इ॒मा। ते॒ वा॒जि॒न्। अ॒व॒मार्ज॑ना॒नीत्य॑व॒ऽमार्ज॑नानि। इ॒मा। श॒फाना॑म्। स॒नि॒तुः। नि॒धानेति॑ नि॒ऽधाना॑। अत्र॑। ते॒। भ॒द्राः। र॒श॒नाः। अ॒प॒श्य॒म्। ऋ॒तस्य॑। याः। अ॒भि॒रक्ष॒न्तीत्य॑भि॒ऽरक्ष॑न्ति। गो॒पाः ॥१६ ॥

Mantra without Swara
इमा ते वाजिन्नवमार्जनानीमा शफानाँ सनितुर्निधाना । अत्रा ते भद्रा रशनाऽअपश्यमृतस्य याऽअभिरक्षन्ति गोपाः ॥

इमा। ते वाजिन्। अवमार्जनानीत्यवऽमार्जनानि। इमा। शफानाम्। सनितुः। निधानेति निऽधाना। अत्र। ते। भद्राः। रशनाः। अपश्यम्। ऋतस्य। याः। अभिरक्षन्तीत्यभिऽरक्षन्ति। गोपाः॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वाजिन्) घोड्याप्रमाणे (विद्यादीक्षेत्रात) वेग आदी गुणांनी सुशोभित हे सेनाधीश, मी (एक अश्‍वसेवक वा साईस) (ते) आपल्या (इमा) या तबेल्यातील घोड्यांची (अवमार्जनानी) (स्वच्छ करणे, खरारा करणे आदी) शुद्धी क्रिया करतो तसेच (इमा) या (शफानाम्) खुर आदी स्वच्छ ठेवणे आदी विषयक (सनितुः) नियमांचे पालन करीत अश्‍वाच्या अन्य (निधाना) अवयवांचेही निरीक्षण करतो (अवयवांच्या स्वच्छतेविषयी काळजी घेतो) (अत्र) या सैन्यात (ते) आपल्या घोड्याचा (या) हा जो (रशनाः) लगाम आहे, तो (भद्राः) सुंदर, शुभ व दृढ असून (गोपाः) कोणत्या ही उपद्रवापासून रक्षण करणारा आहे. तो लगाम (ऋतस्य) सत्याची (युद्धाच्या व अश्‍वारोहण कलेच्या नियमांची) (अभिरक्षन्ति) सर्वतः रक्षा करणारा आहे. मी (अश्‍वसेवक) हे सर्व पाहत आहे. (अश्‍वपालनाविषयी पूर्णतः जागरूक आहे) हे सेवाधीश, आपणही हे सर्व पाहून घ्या (मी जे म्हणत आहे, ते सत्य असल्याची खात्री करून घ्या) ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक घोड्याला स्नान, खरारा आदीद्वारे स्वच्छ ठेवतात, त्याच्या खुरांसाठी लोखंडी नाल वापरतात, तसेच लगाम आणि अश्‍वारोहणासाठी आवश्यक साहित्य तयार ठेवतात. आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देतात, ते लोक युद्धादी कार्यात आपले लक्ष्य पूर्ण करू शकतात. ॥16॥
Subject
मनुष्यांनी अश्‍वपालन का करावे, याविषयी -