Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 29 / Mantra 14

60 Mantra
29/14
Devata- अग्निर्देवता Rishi- भार्गवो जमदग्निर्ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
असि॑ य॒मोऽअस्या॑दि॒त्योऽअ॑र्व॒न्नसि॑ त्रि॒तो गुह्ये॑न व्र॒तेन॑।असि॒ सोमे॑न स॒मया॒ विपृ॑क्तऽआ॒हुस्ते॒ त्रीणि॑ दि॒वि बन्ध॑नानि॥१४॥

असि॑। य॒मः। असि॑। आ॒दि॒त्यः। अ॒र्व॒न्। असि॑। त्रि॒तः। गुह्ये॑न। व्र॒तेन॑। असि॑। सोमे॑न। स॒मया॑। विपृ॑क्त॒ इति॒ विऽपृ॑क्तः। आ॒हुः। ते॒। त्रीणि॑। दि॒वि। बन्ध॑नानि ॥१४ ॥

Mantra without Swara
असि यमोऽअस्यादित्योऽअर्वन्नसि त्रितो गुह्येन व्रतेन । असि सोमेन समया विपृक्तऽआहुस्ते त्रीणि दिवि बन्धनानि् ॥

असि। यमः। असि। आदित्यः। अर्वन्। असि। त्रितः। गुह्येन। व्रतेन। असि। सोमेन। समया। विपृक्त इति विऽपृक्तः। आहुः। ते। त्रीणि। दिवि। बन्धनानि॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अर्वन्) वेगवान (म्हणजे तीव्रतेने पसरणार्‍या) अग्नीप्रमाणे वेगवान् हे महोदय, आपण (गुह्येन) गुह्य वा गुप्त (व्रतेन) स्वभावाने आणि (त्रितः) कर्म, उपासना व ज्ञान या तीन व्रताने (बांधलेले आहात) आपण मनात कोणतातरी गुप्त हेतू ठेवून कार्यरत आहात) आपण (यमः) नियमकर्ता न्यायाधीशाप्रमाणे (असि) आहात. (आदित्यः) सूर्याप्रमाणे विद्येने प्रकाशित (असि) आहात. (सोबेन) ऐश्‍वर्याशी (विप्रक्तः) विशेषत्वाने संबद्ध (असि) आहात. (ते) आपल्या (दिवी) प्रकाशात वा वशात (त्रीणि) तीन (बन्धनानि) बन्धनें आहेत म्हणजे ऋषिऋण, देवऋण व पितृऋण या तीन ऋणांच्या बन्धनात आपण बांधलेले आहात, असे लोक (आहुः) म्हणतात (या तीन बंधनांतून मुक्तीसाठी व्रतस्थ आहात) ॥14॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, तुम्हास उचित आहे की तुम्ही न्यायाधीश, सूर्य, चंद्र आदीचे गुण ग्रहण करा. ज्याप्रमाणे या जगात वायू आणि सूर्य आकर्षणशक्तीद्वारा एकमेकाशी बांधले गेले आहेत, तद्वत शरीर, वाणी आणि मन, यांच्यामधे पारस्परिक आकर्षक असावे व सर्वजण प्रेमाच्या बंधनाने बांधलेले असावेत.॥14॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -