Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 6

46 Mantra
28/6
Devata- इन्द्रो देवता Rishi- बृहदुक्थो वामदेव ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
होता॑ यक्षदु॒षेऽ इन्द्र॑स्य धे॒नू सु॒दुघे॑ मा॒तरा॑ म॒ही।स॒वा॒तरौ॒ न तेज॑सा व॒त्समिन्द्र॑मवर्द्धतां वी॒तामाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥६॥

होता॑। य॒क्ष॒त्। उ॒षेऽइत्यु॒षे। इन्द्र॑स्य। धे॒नूऽइति॑ धे॒नू। सु॒दुघे॒ऽइति॑ सु॒ऽदुघे॑। मा॒तरा॑। म॒हीऽइति॑ म॒ही। स॒वा॒तरा॒विति॑ सऽवा॒तरौ॑। न। तेज॑सा। व॒त्सम्। इन्द्र॑म्। अ॒व॒र्द्ध॒ता॒म्। वी॒ताम्। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥६ ॥

Mantra without Swara
होता यक्षदुषेऽइन्द्रस्य धेनू सुदुघे मातरा मही । सवातरौ न तेजसा वत्समिन्द्रमवर्धताँवीतामाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। उषेऽइत्युषे। इन्द्रस्य। धेनूऽइति धेनू। सुदुघेऽइति सुऽदुघे। मातरा। महीऽइति मही। सवातराविति सऽवातरौ। न। तेजसा। वत्सम्। इन्द्रम्। अवर्द्धताम्। वीताम्। आज्यस्य। होतः। यज॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) सुखदाता महोदय (आपण या बालकाला प्राप्त व्हा, याला आपले ज्ञान द्या) (इन्द्रस्य) विद्युतेच्या (सुदुघ) सुंदर कामनांची पूर्ती करणार्‍या (मातरा) माते प्रमाणे आणि (मही) महान (धेनू, सवातरौ) वायूसह विद्यमान आणि दूध देणार्‍या गायी (न) प्रमाणे असलेल्या (उषे) या भौतिक अग्नी आणि सूर्यरूप अग्नीच्या (तेजसा) तीव्र प्रतापाने (इन्द्रम्) परमैश्‍वर्ययुक्त (वत्सम्) बालकाला (वीताम्) आपण जसे प्राप्त होता, तसेच (होता) एक दाता (आज्यस्य) फेकून देण्याच्या योग्यतेच्या वस्तूचाही (यक्षत्) संग्रह करतो आणि त्याद्वारे हळूहळू आपली (यज) यज्ञ करा व संपत्ती वाढवा. ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे वायूकडून प्रेरित होऊन भौतिक अग्नी व विद्युयग्नी सूर्याचा तेज वाढवितात, (तसे तुम्हीही आपला प्रताप व तेज वाढवा) तसेच ज्याप्रमाणे दुग्धधात्री गायीप्रमाणे हे प्रतापी दिवस रात्र सर्व दैनिक व्यवहारांचा आरंभ करणारे व समाप्ती करणारे आहे, तसे (तुम्हीही गायीप्रमाणे दिवस-रात्रचा नियतक्रम ठरवा व त्याप्रमाणे आचरण करा) ॥6॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी