Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 4

46 Mantra
28/4
Devata- रुद्रो देवता Rishi- बृहदुक्थो वामदेव ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
होता॑ यक्षद् ब॒र्हिषीन्द्रं॑ निषद्व॒रं वृ॑ष॒भं नर्या॑पसम्। वसु॑भी रु॒द्रैरा॑दि॒त्यैः स॒युग्भि॑र्ब॒र्हिरास॑दद् वेत्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥४॥

होता॑। य॒क्ष॒त्। ब॒र्हिषि॑। इन्द्र॑म्। नि॒ष॒द्व॒रम्। नि॒स॒द्व॒रमिति॑ निसत्ऽव॒रम्। वृ॒ष॒भम्। नर्या॑पस॒मिति॒ नर्य॑ऽअपसम्। वसु॑भि॒रिति॒ वसु॑ऽभिः। रु॒द्रैः। आ॒दि॒त्यैः। स॒युग्भि॒रिति॑ स॒युक्ऽभिः॑। ब॒र्हिः। आ। अ॒स॒द॒त्। वेतु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥४ ॥

Mantra without Swara
होता यक्षद्बरिषीन्द्रन्निषद्वरँवृषभन्नर्यापसम् । वसुभी रुद्रैरादित्यैः सुयुग्भिर्बर्हिरासदद्वेत्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। बर्हिषि। इन्द्रम्। निषद्वरम्। निसद्वरमिति निसत्ऽवरम्। वृषभम्। नर्यापसमिति नर्यऽअपसम्। वसुभिरिति वसुऽभिः। रुद्रैः। आदित्यैः। सयुग्भिरिति सयुक्ऽभिः। बर्हिः। आ। असदत्। वेतु। आज्यस्य। होतः। यज॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) उत्तम ज्ञान देणारे महोदय, (होता) सुख देणारा एक माणूस जसे (सयुग्भिः) योगाविषयी जिज्ञासू वा नवाभ्यासी मनुष्याला साथ देणार्‍या (वसुभिः) प्रथम स्तराच्या विद्वांनासह तसेच (रूद्रः) मध्यम स्तराच्या विद्वानासह आणि (आदित्यैः) उत्तम कोटिच्या विद्वानासह (बर्हिषि) उत्तम विद्वानांच्या सभेत (बसतो आणि सुखी होतो तसे तुम्ही सुखी व्हा) (निषद्वरम्) श्रेष्ठजन ज्याच्या जवळ बसतात, त्या (वृषभम्) महाबली (नर्यापसम्) मनुष्यांच्या उत्तम कार्याचे सेवन करणार्‍या (इन्द्रम्) सुंदर राजनितीने सुशोभित राजाला (यक्षत्) लोक प्राप्त होतात. (राजाजवळ जातात) आणि (आजस्य) योग्य न्याय देणार्‍या (बर्हिः) सभेमधे (आ, असदत्) बसतात (आपले गार्‍हाणें राज्यसभेत मांडतात) आणि (वेतु) सुखी होतात, तसे हे होतः, तुम्हीही राजसभेत (यज) जा व न्यायाची मागणी करा. ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी आदी लोक, प्राण आदी वायू आणि कालाचे अवयव (समयाचे विभाग म्हणजे) बारा बहिने, हे सर्व सोबत राहतात, एकत्र विद्यमान आहेत, तसे राजा आणि प्रजा यांनी एकमेकाशी अनुकूल वर्तन करून राजाने प्रजेचे पालन उत्तम रीतीने केले, तर तो राजा प्रशंसनीय आणि उत्तम म्हणविला जातो ॥4॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -