Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 2

46 Mantra
28/2
Devata- इन्द्रो देवता Rishi- बृहदुक्थो वामदेव ऋषिः Chhand- निचृदतिजगती Swara- निषादः
Mantra with Swara
होता॑ यक्ष॒त् तनू॒नपा॑तमू॒तिभि॒र्जेता॑र॒मप॑राजितम्। इन्द्रं॑ दे॒वस्व॒र्विदं॑ प॒थिभि॒र्मधु॑मत्तमै॒र्नरा॒शꣳसे॑न॒ तेज॑सा॒ वेत्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥२॥

होता॑। य॒क्ष॒त्। तनू॒नपा॑त॒मिति तनू॒ऽनपा॑तम्। ऊ॒तिभि॒रित्यू॒तिऽभिः॑। जेता॑रम्। अप॑राजित॒मित्यप॑राऽजितम्। इन्द्र॑म्। दे॒वम्। स्व॒र्विद॒मिति॑ स्वः॒ऽविद॑म्। प॒थिभि॒रिति॑ प॒थिऽभिः॑। मधु॑मत्तमै॒रिति॒ मधु॑मत्ऽतमैः। नरा॒शꣳसे॑न। तेज॑सा। वेतु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥२ ॥

Mantra without Swara
होता यक्षत्तनूनपातमूतिभिर्जेतारमपराजितम् । इन्द्रन्देवँ स्वर्विदम्पथिभिर्मधुमत्तमैर्नराशँसेन तेजसा वेत्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। तनूनपातमिति तनूऽनपातम्। ऊतिभिरित्यूतिऽभिः। जेतारम्। अपराजितमित्यपराऽजितम्। इन्द्रम्। देवम्। स्वर्विदमिति स्वःऽविदम्। पथिभिरिति पथिऽभिः। मधुमत्तमैरिति मधुमत्ऽतमैः। नराशꣳसेन। तेजसा। वेतु। आज्यस्य। होतः। यज॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होत:) ग्रहण करणार्‍या (यजमान) मनुष्य, तुम्ही (होता) सुखदायक आणि (ऊतिभिः) रक्षा विषयक प्रयत्नांनी तसेच (मधुमत्तमैः) अतिमधुर जल आदीद्वारे आणि (पथिभिः) धर्ममय उपायांनी (तनूनपातम्) शरीराचे रक्षण करणार्‍या (जेतारम्) सदा विजयी (राजाची संगती करा, त्याच्या आश्रयात रहा) कारण तो (अपराजितम्) कधीही शत्रूकडून पराजित होत नाही, (स्वर्विदम्) सदा सुखी असून (देवम्) विद्या आणि विनयाने संपन्न आहे. अशा त्या (इन्द्रम्) परमैश्‍वर्यकारक राजाची (यक्षत्) संगती करा (नराशेसेन) मनुष्याद्वारे वा प्रजाजनांद्वारे प्रार्थना केल्यानंतर तो राजा (तेजसा) आपल्या तेज व शक्ती (आज्यस्य) प्रस्तूत प्रकरण वा प्रसंगाला (वेतु) जाणतो (व त्याप्रमाणे रक्षणार्थ धावून येतो), त्याप्रमाणे हे, यजमान, तुम्हीही (यज) त्यांची संगती करा. ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे राजा स्वतः राज्यासन करताना न्याय मार्गाचा अवलंब करतात आणि प्रजेची रक्षा करतात, ते कधी पराजित होत नाहीत, उलट ते सदा शत्रूवर विजय मिळवतात. ॥2॥
Subject
राजपुरूष कसे असावेत, याविषयी -