Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 16

46 Mantra
28/16
Devata- इन्द्रो देवता Rishi- अश्विनावृषी Chhand- भुरिगाकृतिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वीऽऊ॒र्जाहु॑ती॒ दुघे॑ सु॒दुघे॒ पय॒सेन्द्र॑मवर्द्धताम्। इष॒मूर्ज॑म॒न्या व॑क्ष॒त्सग्धि॒ꣳ सपी॑तिम॒न्या नवे॑न॒ पूर्वं॒ दय॑माने पुरा॒णेन॒ नव॒मधा॑ता॒मूर्ज॑मू॒र्जा॑हुतीऽ ऊ॒र्जय॑माने॒ वसु॒ वार्या॑णि॒ यज॑मानाय शिक्षि॒ते व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य वीतां॒ यज॑॥१६॥

दे॒वीऽइति॑ दे॒वी। ऊ॒र्जाहु॑ती॒ इत्यू॒र्जाऽआ॑हुती। दुघे॑। सु॒दुघे॒ इति॑ सु॒ऽदुघे॑। पय॑सा। इन्द्र॑म्। अ॒व॒र्द्ध॒ता॒म्। इष॑म्। ऊर्ज॑म्। अ॒न्या। व॒क्ष॒त्। सग्धि॑म्। सपी॑ति॒मिति॒ सऽपी॑तिम्। अ॒न्या। नवे॑न। पूर्व॑म्। दय॑माने॒ इति॒ दय॑माने। पु॒रा॒णेन॑। नव॑म्। अधा॑ताम्। ऊर्ज॑म्। ऊ॒र्जाहु॑ती॒ इत्यू॒र्जाऽआ॑हुती। ऊ॒र्जय॑मानेऽइत्यू॒र्जय॑माने। वसु॑। वार्या॑णि। यज॑मानाय। शि॒क्षि॒तेऽइति॑ शिक्षि॒ते। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। वी॒ता॒म्। यज॑ ॥१६ ॥

Mantra without Swara
देवीऽऊर्जाहुती दुघे पयसेन्द्रमवर्धताम् । इषमूर्जमन्या वक्षत्सग्धिँ सपीतिमन्या नवेन पूर्वन्दयमाने पुराणेन नवमधातामूर्जाहुतीऽऊर्जयमाने वसु वृयाणि यजमानाय शिक्षिते वसुवने वसुधेयस्य वीताँयज ॥

देवीऽइति देवी। ऊर्जाहुती इत्यूर्जाऽआहुती। दुघे। सुदुघे इति सुऽदुघे। पयसा। इन्द्रम्। अवर्द्धताम्। इषम्। ऊर्जम्। अन्या। वक्षत्। सग्धिम्। सपीतिमिति सऽपीतिम्। अन्या। नवेन। पूर्वम्। दयमाने इति दयमाने। पुराणेन। नवम्। अधाताम्। ऊर्जम्। ऊर्जाहुती इत्यूर्जाऽआहुती। ऊर्जयमानेऽइत्यूर्जयमाने। वसु। वार्याणि। यजमानाय। शिक्षितेऽइति शिक्षिते। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। वीताम्। यज॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे विद्वान, ज्याप्रमाणे (वसुधेयस्य) ईश्‍वराच्या ज्या (जगात) ऐश्‍वर्य अर्जित केले जाते (वसुवने) त्या धनदानाचे स्थान, या जगात विद्वानांनी (वार्याणि) ग्रहणीय (वसु) धन (अर्जित केले आहे वा करतात तसेच ज्या जगात (शिक्षिते) शिक्षा वा व्यवहाराच्या नियमाचे शिक्षण घेणार्‍या (यजमानाय) संगती, सहकार्य चाहणार्‍या प्राण्यासाठी (वीताम्) सर्व नियम प्राप्त होतात (तसे तुलाही प्राप्त व्हावेत.) (ऊर्जाहुती बल व प्राण यांना धारण करणारे आणि (देवी) दिव्य गुण प्राप्त करून देणारे दिवस आणि रात्र (पदसा) जलाद्वारे (दुघे) सुखांनी जगाला परिपूर्ण करतात तसेच (सुदुघे) सुंदर कामना पूर्ण करणारे होत ते दिवस-रात्र (इन्द्रम्) ऐश्‍वर्याची (अवर्धताम्) वृद्वी करतात. त्या दिवस रात्र पैकी (अन्या) एक (इषम्) अन्न-धान्य आणि (ऊर्जम्) बळ (वक्षत्) प्राप्त करून देते (म्हणजे रात्र शांति व विश्रांती देते) आणि (अन्या) दिवसरूप वेळा (सपीतिम्) पिण्याच्या पदार्था व्यतिरिक्त (सग्धिम्) भोजनदेखील पोहचविते (वा सर्वांस देते) (दयमान) येणारी व गेलेली अशा दोन रात्री (नवेन) नवीन पदर्थांसह (पूर्वम्) प्राचीन आणि (पुराणेम) जुन्या पदार्थांसह (नवम्) नवीन स्वरूप (अधाताम्) धारण करोत (आम्हांला कालची रात्र व येणारी रात्र नवीन समृद्धी घेऊन येणारी होवो) (ऊर्जयमाने) शक्ती वाढवीत तर (ऊर्जाहुती) कधी शक्तीचा र्‍हास करीत दिवस-रात्र यांनी (ऊर्जम्) नवीन जीवन द्यावे, तसे हे विद्वान, तुम्हीही (यज) यज्ञ करा. ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जसे हे रात्र-दिवस आपल्या पूर्वापार रूप जाणून एकानंतर एक असे नियमाने देत-जात योग्य आहार विहारासाठी उचित वातावरण निर्माण करतात, तसेच अग्नीत आहुत सर्व आहुती सर्व सुख देणार्‍या असतात. जे लोक समयाच्या एक छोटासा अंश देखील व्यर्थ घालवतात, आणि वायू, जल आदी नदार्थाना यज्ञाद्वारे शुद्ध करीत नाहीत, पुढे होणार्‍या आपल्या हानीचा अनुमान आधीच करून घेत नाहीत, तर ते कदापी सुखी होणार नाहीत ॥16॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -