Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 1

46 Mantra
28/1
Devata- इन्द्रो देवता Rishi- बृहदुक्थो वामदेव ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
होता॑ यक्षत्स॒मिधेन्द्र॑मि॒डस्प॒दे नाभा॑ पृथि॒व्याऽ अधि॑। दि॒वो वर्ष्म॒न्त्समि॑ध्यत॒ऽओजि॑ष्ठश्चर्षणी॒सहां॒ वेत्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥१॥

होता॑। य॒क्ष॒त्। स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। इन्द्र॑म्। इ॒डः। प॒दे। नाभा॑। पृ॒थि॒व्याः। अधि॑। दि॒वः। वर्ष्म॑न्। सम्। इ॒ध्य॒ते॒। ओजि॑ष्ठः। च॒र्ष॒णी॒सहा॑म्। च॒र्ष॒णी॒सहा॒मिति॑ चर्षणि॒ऽसहा॑म्। वेतु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥१ ॥

Mantra without Swara
होता यक्षद्समिधेन्द्रमिडस्पदे नाभा पृथिव्याऽअधि । दिवो वर्ष्मन्त्समिध्यतऽओजिष्ठश्चर्षणीसहाँवेत्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। समिधेति सम्ऽइधा। इन्द्रम्। इडः। पदे। नाभा। पृथिव्याः। अधि। दिवः। वर्ष्मन्। सम्। इध्यते। ओजिष्ठः। चर्षणीसहाम्। चर्षणीसहामिति चर्षणिऽसहाम्। वेतु। आज्यस्य। होतः। यज॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) यजमान, (होता) शुभलक्षणांनी युक्त कोणी मनुष्य ज्याप्रमाणे (समिधा) ज्ञानाच्या प्रकाशाने (इडः) वाणी विषयक (पदे) प्राप्त व्यवहारात (योग्य प्रकारे कार्य करतो) तो (पृथिव्याः) भूमीच्या (नाभा) मधे (भूमीवर) आणि (दिवः) आकाशाच्या (अधि) वर (वर्ष्मन्) बरसणार्‍या मेघमंडळामधे (इन्द्रम्) विद्युतरूप अग्नीचा (यक्षत्) संयोग करतो (याज्ञिकजन यज्ञीय पदार्थांचा होम करून वृष्टी, विद्युत, मेघ यांवर नियंत्रण ठेवतो) त्यामुळे तो (ओजिष्ठः) अतिशय बली होऊन (चर्षणीसहाम्) मनुष्य समूहाचे वा शत्रु सैन्यांचे आक्रमण (सम्, इष्यते) सहजपणे परतवू शकतो. तो जसा (आज्यस्य) घृत आदी यज्ञीय पदार्थ संग्रहीत करतो, तद्वत, हे यजमान, तूही (यज) यज्ञ कर वा त्या याज्ञिकाची संगती कर. ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी वेदमंत्राच्या उच्चारणाद्वारे सुगंधित द्रव्य अग्नीत टाकावे आणि ते पदार्थांना मेघमंडळापर्यंत पाठवून वृष्टिजल शुद्ध करावे आणि अशाप्रकारें सर्वांची शक्ती वाढवावी ॥1॥
Subject
आता अठ्ठाविसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात सांगितले आहे की मनुष्यांनी यज्ञाद्वारे आपले बळ कसे वाढवावे.