Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 9

45 Mantra
27/9
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒मु॒त्र॒भूया॒दध॒ यद्य॒मस्य॒ बृह॑स्पतेऽ अ॒भिश॑स्ते॒रमु॑ञ्चः।प्रत्यौ॑हताम॒श्विना॑ मृ॒त्युम॑स्माद् दे॒वाना॑मग्ने भि॒षजा॒ शची॑भिः॥९॥

अ॒मु॒त्र॒भूया॒दित्य॑मुत्र॒ऽभूया॑त्। अध॑। यत्। य॒मस्य॑। बृह॑स्पते। अ॒भिश॑स्ते॒रित्य॒भिऽश॑स्तेः। अमु॑ञ्चः। प्रति॑। औ॒ह॒ता॒म्। अ॒श्विना॑। मृ॒त्युम्। अ॒स्मा॒त्। दे॒वाना॑म्। अ॒ग्ने॒। भि॒षजा॑। शची॑भिः ॥९ ॥

Mantra without Swara
अमुत्रभूयादध यद्यमस्य बृहस्पतेऽअभिसस्तेरमुञ्चः । प्रत्औहतामश्विना मृत्युमस्माद्देवानामग्ने भिषजा शचीभिः ॥

अमुत्रभूयादित्यमुत्रऽभूयात्। अध। यत्। यमस्य। बृहस्पते। अभिशस्तेरित्यभिऽशस्तेः। अमुञ्चः। प्रति। आैहताम्। अश्विना। मृत्युम्। अस्मात्। देवानाम्। अग्ने। भिषजा। शचीभिः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (बृहस्पते) महान जनांचे ही रक्षण करणारे विद्वान, आपण (अमुत्रभूयात्) परजन्मात होणार्‍या वा (पुढील जन्मात होऊ शकणार्‍या संभावित) अपराध वा दुष्कर्मापासून (अमुञ्चः) मुक्त असा (पुढील जन्मात ही आपणांकडून कोणते दुष्कृत्य घडू नये) अध) त्यानंतर (यत्) जो कोणी (यमस्य धर्माला नियमकर्ता (अधिकार्‍याच्या वा गुरूच्या) आदेशाप्रमाणे वागणारा असेल, त्याला (मृत्युम्) मृत्यूपासून सोडवा. हे (अग्ने) उत्तम वैद्य, ज्याप्रमाणे (अश्‍विना) अध्यापक आणि उपदेशक (राचीभिः) उत्तम कर्माद्वारे व विचारांद्वारे (मानसिक वा आध्यात्मिक दोष दूर करतात) तद्वत आपण (भिषजा) रोगनिवारक औषधी (प्रति, औहताम्) विशेष रीतीने तयार करा आणि (अस्मात्) त्या औषधीने (देवानाम्) विद्वानांचे आरोग्य सुव्यस्थित ठेवा. ॥9॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे अध्यापक आणि उपदेशक सर्वांना इहलोक व परलोकामधे सुखी होण्याासाठी उत्तम शिक्षण-संस्कार देतात, तेच श्रेष्ठ असतात. त्यांनी यत्न करावे की ज्यायोगे लोक ब्रह्मचर्य-पालन करतील व अल्पावस्थेतच मृत्यूचे शिकार होणार नाहीत. असे केल्यामुळे त्यांची हानी होणार नाही. ॥9॥
Subject
अध्यापक आणि उपदेशक, यांनी काय करावे, याविषयी