Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 44

45 Mantra
27/44
Devata- वायुर्देवता Rishi- शंयुर्ऋषिः Chhand- स्वराड्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
ऊ॒र्जो नपा॑त॒ꣳस हि॒नायम॑स्म॒युर्दाशे॑म ह॒व्यदा॑तये।भुव॒द्वाजे॑ष्ववि॒ता भुव॑द् वृ॒धऽउ॒त त्रा॒ता त॒नूना॑म्॥४४॥

ऊ॒र्जः। नपा॑तम्। सः। हि॒न। अ॒यम्। अ॒स्म॒युरित्य॑स्म॒ऽयुः। दाशे॑म। ह॒व्यदा॑तय॒ इति॑ ह॒व्यऽदा॑तये। भुव॑त्। वाजे॑षु। अ॒वि॒ता। भुव॑त्। वृ॒धे। उ॒त। त्रा॒ता। त॒नूना॑म् ॥४४ ॥

Mantra without Swara
ऊर्जा नपातँ स हिनायमस्मयुर्दाशेम हव्यदातये । भुवद्वाजेष्वविता भुवद्वृध उत त्राता तनूनाम् ॥

ऊर्जः। नपातम्। सः। हिन। अयम्। अस्मयुरित्यस्मऽयुः। दाशेम। हव्यदातय इति हव्यऽदातये। भुवत्। वाजेषु। अविता। भुवत्। वृधे। उत। त्राता। तनूनाम्॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यार्थी, (सः) तो तू आपल्या (ऊर्जाः) पराक्रम (नपातम्) आणि जपुन ठेवण्यास आवश्यक अशा विद्याज्ञानाला (हिन) वाढव. यामुळे (अयम्) हा समोर उभी असलेला तू, (अस्मयुः) आम्हाला चाहणारा आणि (वाजेषु) युद्धामधे आमचे (अविता) रक्षण करणारा (भुवत्) होशील. (उत) आणि (तनूनाम्) आमच्या शरीराच्या (वृधे) वृद्धीसाठी (त्राता) पालन करणारा (भुवत्) होशील. (तुमच्या या गुणांमुळे) आम्ही (तुमचे शिक्षक) (हव्यदातय) दातव्य पदार्थ देण्यासाठी तुमचा (दाशेम) स्वीकार करू (म्हणजे जे जे जीवनावश्यक पदार्थ तुम्हाला हवेत, ते ते देण्यांसाठी तुम्हाला पात्र मानू) ॥44॥
Essence
भावार्थ - जो विद्यार्थी आपला पराक्रम व आपली शक्ती वाया घालवीत नाही, शरीर आणि आत्म्याची उन्नती करीत त्याचे रक्षण करतो, त्यालाच अथवा तशा विद्यार्थ्यालाच आप्त शिक्षक जनांनी विद्यादान करावे. याहून विपरीत असा जो लंपट, दुराचारी आणि निंदक विद्यार्थी असेल, तो विद्याग्रहणाचा अधिकारी नाही, असे जाणावे. ॥44॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -