Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 43

45 Mantra
27/43
Devata- अग्निर्देवता Rishi- भार्गव ऋषिः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पा॒हि नो॑ऽ अग्न॒ऽ एक॑या पा॒ह्युत द्वि॒तीय॑या।पा॒हि गी॒र्भि॑स्ति॒सृभि॑रूर्जां पते पा॒हि च॑त॒सृभि॑र्वसो॥४३॥

पा॒हि। नः॒। अ॒ग्ने॒। एक॑या। पा॒हि। उ॒त। द्वि॒तीय॑या। पा॒हि। गी॒र्भिरिति॑ गीः॒ऽभिः। ति॒सृभि॒रिति॑ ति॒सृऽभिः॑। ऊ॒र्जा॒म्। प॒ते॒। पा॒हि। च॒त॒सृभि॒रिति॑ चत॒सृऽभिः॑। व॒सो॒ इति॑ वसो ॥४३ ॥

Mantra without Swara
पाहि नो अग्न एकया पाह्युत द्वितीयया । पाहि गीर्भिस्तिसृभिरूर्जाम्पते पाहि चतसृभिर्वसो ॥

पाहि। नः। अग्ने। एकया। पाहि। उत। द्वितीयया। पाहि। गीर्भिरिति गीःऽभिः। तिसृभिरिति तिसृऽभिः। ऊर्जाम्। पते। पाहि। चतसृभिरिति चतसृऽभिः। वसो इति वसो॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वसो) सुंदर निवासस्थान देणारे (वा सर्वांना योग्यतेप्रमाणे वसविणारे) (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी हे विद्वान, आपण आपल्या (एकया) एक उत्तम शिक्षा-ज्ञानादी द्वारे (नः) आमची (पाहि) रक्षा करा. (द्वितीया) आपल्याकडे असलेली दुसरी कला-अध्यापन कला, त्या द्वारे (पाहि) आमचे रक्षण करा. (तिसृभिः) कर्म, ज्ञान आणि उपासना या तीन (गीभिः) वाणीद्वारे आमचे रक्षण करा. हे (ऊर्जाम्) बळ, उत्साहाचे (पते) रक्षक आपण (चतसृभिः) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना साध्य वा प्राप्त करणारी जी प्रकारची वाणी आहे, (उत) त्याद्वारेही आपण आमचे रक्षण करा ॥43॥
Essence
भावार्थ - धर्माला सत्ववादी आप्तजन हेच मानतात की उपदेश करणे आणि अध्यापन करणे यापेक्षा कल्याणाचे कोणतेही दुसरें साधन नाही. त्यामुळे ते नित्यप्रति अज्ञानी जनांवर कृपा करून त्यांना उपदेश करतात व शिकवितात ॥43॥
Subject
आप्त धर्मात्माजनांनी काम करावे, याविषयी -