Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 42

45 Mantra
27/42
Devata- यज्ञो देवता Rishi- शंयुर्ऋषिः Chhand- बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
य॒ज्ञाय॑ज्ञा वोऽअ॒ग्नये॑ गि॒रागि॑रा च॒ दक्ष॑से।प्रप्र॑ व॒यम॒मृतं॑ जा॒तवे॑दसं प्रि॒यं मि॒त्रं न श॑ꣳसिषम्॥४२॥

य॒ज्ञाय॒ज्ञेति॑ य॒ज्ञाऽय॑ज्ञा॒। वः॒। अ॒ग्नये॑। गि॒रागि॒रेति॑ गि॒राऽगि॑रा। च॒। दक्ष॑से। प्रप्रेति॒ प्रऽप्र॑। व॒यम्। अ॒मृत॑म्। जा॒तवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। प्रि॒यम्। मि॒त्रम्। न। श॒ꣳसि॒ष॒म् ॥४२ ॥

Mantra without Swara
यज्ञायज्ञा वोऽअग्नये गिरागिरा च दक्षसे । प्रप्र वयममृतञ्जातवेदसम्प्रियम्मित्रन्न शँसिषम् ॥

यज्ञायज्ञेति यज्ञाऽयज्ञा। वः। अग्नये। गिरागिरेति गिराऽगिरा। च। दक्षसे। प्रप्रेति प्रऽप्र। वयम्। अमृतम्। जातवेदसमिति जातऽवेदसम्। प्रियम्। मित्रम्। न। शꣳसिषम्॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे मनुष्यांनो, जसा मी (एक विद्वान) (अग्नेये) अग्नीसाठी (च) (गिरागिरा) आणि वाणी वाणीसाठी (भाषा व उच्चारणासांठी) (तुमची प्रशंसा करतो) आणि (दक्षसे) शक्तीसाठी (यज्ञायज्ञा) प्रत्येक यज्ञाच्यावेळी (वः) तुम्हा लोकांची प्रशंसा करतो (कारण की तुम्ही सुंदर व शुद्ध वाणी बोलता आणि मोठ्या श्रद्धेने यज्ञादी कर्म करता.) तद्वत (वयम्) आम्ही विद्वज्जनांनी देखील (जातवेदसम्) ज्ञानी तसेच (अमृतम्) आत्मरूपेण अविनाशी (प्रियम्) प्रिय (मित्रम्) मित्रा (न) प्रमाणे तुम्हा सर्वांची प्रशंसा केली पाहिजे. तुम्ही त्या प्रशंसाप्रमाणे (वा आमच्या अपेक्षेप्रमाणे) आचरण करीत जा ॥42॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा हे दोन अलंकार आहे (मित्रं न) ही उपमा तसेच ‘तुम्ही जसे, तसे आम्ही’ या वाक्यात वाचकशब्द (यथा, न) नाहीत, पण उपमा अलंकार आहे) जे मनुष्य उत्तम शुद्ध सुसंस्कृत वाणीद्वारा यमानुष्ठान करतात आणि आपले बळ वाढवितात, तसेच जे मित्राप्रमाणे विद्वजनांसाठी सत्कार करतात, त्यांच्या संगतीत राहतात, ते अति ज्ञानवान होतात. ॥42॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -