Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 41

45 Mantra
27/41
Devata- इन्द्रो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- पादनिचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒भी षु णः॒ सखी॑नामवि॒ता ज॑रितॄ॒णाम्।श॒तं भ॑वास्यू॒तये॑॥४१॥

अ॒भि। सु। नः॒। सखी॑नाम्। अ॒वि॒ता। ज॒रि॒तॄणाम्। श॒तम्। भ॒वा॒सि॒। ऊ॒तये॑ ॥४१ ॥

Mantra without Swara
अभी षु णः सखीनामविता जरितऋृणाम् । शतम्भवास्यूतये ॥

अभि। सु। नः। सखीनाम्। अविता। जरितॄणाम्। शतम्। भवासि। ऊतये॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, आपण (नः) आमच्या (सखीनाम्) मित्रांचे तसेच (जरितृणाम्) तुमची स्तुती करणार्‍या (वा तुम्हाला विनंती करणार्‍या) लोकांचे (अनिता) रक्षक आहात. आपण (ऊतये) मोठ्या आत्मीयतेने (शतम्) शेकडो प्रकारें (सु, भवासि) आमच्याकरिता सुखकारक होता अथवा व्हा. (अभि) आपण सर्वतः आमच्याकडून सत्कारणीय वा आहात. (आम्ही आपला आदर-सन्मान करतो) ॥41॥
Essence
भावार्थ - जे लोक आपल्या मित्रांचे रक्षक आणि त्यांना अनेक प्रकारे सुख वा सहाय्य देणारे असतात, तसेच अनाथांच्या रक्षणासाठी (पालन-पोषणासाठी) यतन करतात, ते अमाप धनसंपदेचे स्वामी होतात. ॥41॥
Subject
लोकांना धन कसे प्राप्त होईल, यावषियी -