Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 35

45 Mantra
27/35
Devata- वायुर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒भि त्वा॑ शूर नोनु॒मोऽदु॑ग्धाऽ इव धेनवः॑।ईशा॑नम॒स्य जग॑तः स्व॒र्दृश॒मीशा॑नमिन्द्र त॒स्थुषः॑॥३५॥

अ॒भि। त्वा॒। शू॒र॒। नो॒नु॒मः॒। अदु॑ग्धा इ॒वेत्यदु॑ग्धाःऽइव। धे॒नवः॑। ईशा॑नम्। अ॒स्य। जग॑तः। स्व॒र्दृश॒मिति॑ स्वः॒दृऽश॑म्। ईशा॑नम्। इ॒न्द्र॒। त॒स्थुषः॑ ॥३५ ॥

Mantra without Swara
अभि त्वा शूर नोनुमो दुग्धाऽइव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥

अभि। त्वा। शूर। नोनुमः। अदुग्धा इवेत्यदुग्धाःऽइव। धेनवः। ईशानम्। अस्य। जगतः। स्वर्दृशमिति स्वःदृऽशम्। ईशानम्। इन्द्र। तस्थुषः॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (शूर) (इन्द्र) निर्भय वीर सभापती (राजा) आम्ही (राज्याचे प्रजाजन) जे (अदुग्धा इव) (धेनवः) दूध न देणार्‍या भाकड गायीप्रमाणे (असहाय वा व्यर्थप्रमाणे आहोत) ते (अस्थ) या जगतः) जंगम गतिशील आणि (तस्थुषः) स्थावर जड पदार्थांनी भरलेल्या या संसाराचा (ईशानम्) नियन्ता), (स्वर्दृशम्) सुखेन अनुभवण्यास योग्य अशा ईश्‍वराप्रमाणे आपण (ईशानम्) समर्थ स्वामी आहात. आम्ही (निराधार, निर्ब, प्रजाजन) यामुळे (त्वा) आपल्याकडे (अभि, नोमुमः) समोर येऊन आपला सत्कार करतो (आपण आम्हाला आश्रय वा आधार द्या) ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. हे राजा, जर आपण पक्षपातीपणा सोडून ईश्‍वराप्रमाणे न्यायाधीश व्हाल व आम्हास सत्य न्याय द्याल, तर आम्ही सदैव आपल्याशी अनुकूल राहू. यदा कदाचित आमच्याकडून राज्याचा कर, कृषिकर आदी देणे शक्य झाले नाही, तरीही आपण आमची रक्षा अवश्य करावी (अशी आमची प्रार्थना आहे) ॥35॥
Subject
या मंत्रात राजधर्मा विषयी -