Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 31

45 Mantra
27/31
Devata- वायुर्देवता Rishi- अजमीढ ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वा॒युर॑ग्रे॒गा य॑ज्ञ॒प्रीः सा॒कं ग॒न्मन॑सा य॒ज्ञम्।शि॒वो नि॒युद्भिः॑ शि॒वाभिः॑॥३१॥

वा॒युः। अ॒ग्रे॒गाऽइत्य॑ग्रे॒ऽगाः। य॒ज्ञ॒प्रीरिति॑ यज्ञ॒ऽप्रीः। सा॒कम्। ग॒न्। मन॑सा। य॒ज्ञम्। शि॒वः। नि॒युद्भि॒रिति॑ नि॒युत्ऽभिः॑। शि॒वाभिः॑ ॥३१ ॥

Mantra without Swara
वायुरग्रेगा यज्ञप्रीः साकङ्गन्मनसा यज्ञम् । शिवो नियुद्भिः शिवाभिः ॥

वायुः। अग्रेगाऽइत्यग्रेऽगाः। यज्ञप्रीरिति यज्ञऽप्रीः। साकम्। गन्। मनसा। यज्ञम्। शिवः। नियुद्भिरिति नियुत्ऽभिः। शिवाभिः॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, जसे (वायुः) हे पवन, (नियुद्भिः) आपल्या सुनिश्‍चित अशा (शिवाभिः) मंगलकारी कार्यांद्वारे (यज्ञम्) यज्ञाच्या प्रसंगी (गन्) येतो (यज्ञामुळे उष्णतेमुळे वायूचे गमनागमन क्रिया वाढते) तद्वत (शिवः) कल्याणकारी (अग्रेग्राः) अग्रगामी आपण (यज्ञपीः) यज्ञाच्या पुर्णतेसाठी (मनसा) खर्‍या भावने (साकम्) सह यज्ञाच्या वेळी इथे या (अशी आम्हा याज्ञिकांची प्रार्थना आहे) ॥31॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. या मंत्रात (आ. याहि) हे शब्द नाहीत, पण या दोन शब्दांची अनुवृत्ती मागील मंत्रातून घेण्यात आली आहे. जसा वायू अनेक पदार्थांसह यत्र-तत्र जातो-येतो, त्याप्रमाणे विद्वानांनी धर्ममय कर्म वा कार्यक्रमात जावे आपल्या ज्ञान-विज्ञानाचा लाभ जनांस करून द्यावा. ॥31॥
Subject
विद्वानांनी काय केले पाहिजे, याविषयी